एक्स्प्लोर
वर्गात घुसून 20 विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापकांची हत्या
सहा जणांच्या टोळीने वर्गात घुसून 60 वर्षीय रंगनाथ नायक यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

बंगळुरु : बंगळुरुत भरवर्गात घुसून शाळेच्या मुख्याध्यापकांची हत्या करण्यात आली. 20 विद्यार्थ्यांच्या देखत सहा जणांनी 60 वर्षीय रंगनाथ नायक यांचा जीव घेतला. हवनूर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक रंगनाथ रविवारी दहावीच्या 20 विद्यार्थ्यांची विशेष शिकवणी घेत होते. त्यावेळी सहा जणांची टोळी वर्गात शिरली आणि त्यांनी रंगनाथ यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हत्येनंतर सहाही आरोपींनी एका कारमधून पलायन केलं. बंगळुरुतील अग्रहरा दसरहल्ली भागात ही धक्कादायक घटना घडली. शाळेच्या जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सहापैकी एका आरोपीला बंगळुरुच्या महालक्ष्मी लेआऊट परिसरातून अटक करण्यात आली आहे. डोळ्यांदेखत मुख्याध्यापकाची हत्या झाल्याने विद्यार्थ्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
पुणे
धुळे
राजकारण























