Bangalore Meat Ban : गणेश चतुर्थीला मांस विक्रीवर बंदी, बंगळुरु मनपाचा निर्णय, ओवेसींचं भाजपवर टीकास्त्र
कन्नड भाषेत या संबंधीचा आदेश बंगळुरु महानगरपालिकेने बजावला आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला पालिका हद्दीतील मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.
![Bangalore Meat Ban : गणेश चतुर्थीला मांस विक्रीवर बंदी, बंगळुरु मनपाचा निर्णय, ओवेसींचं भाजपवर टीकास्त्र Bangalore meat ban on 31 august Ganesh Chaturthi 2022 Bengaluru Civic Agency decision Karnataka news Bangalore Meat Ban : गणेश चतुर्थीला मांस विक्रीवर बंदी, बंगळुरु मनपाचा निर्णय, ओवेसींचं भाजपवर टीकास्त्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/96f1531092296fd81e458d43d4f39b3f166183648119183_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bangalore Meat Ban : गणेश चतुर्थीनिमित्त (Ganesh Chaturthi 2022) बंगळुरू महानगरपालिकेने (bangalore municipal corporation) मोठा निर्णय घेतला आहे. बंगळुरु महानगरपालिका हद्दीत मांस विक्री आणि प्राण्याच्या हत्येवर बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे कर्नाटकात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी गणरायाचं आगमन होतं. त्यामुळे या दिवशी मांस विक्री आणि प्राण्याच्या हत्येवर बंदी घालण्यात आली आहे.
सोमवारी कन्नड भाषेत या संबंधीचा आदेश बंगळुरु महानगरपालिकेने बजावला आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला पालिका हद्दीतील मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.
असदुद्दीन ओवेसी यांचं टीकास्त्र
दरम्यान, बंगळुरु महापालिकेच्या या निर्णयावर MIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. महापालिकेचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा ओवेसींनी केला आहे. कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोपही ओवेसी यांनी केला आहे.
कर्नाटकात 80 टक्के लोक मांसाहार करतात. सरकारने मांस विक्रीवर बंदी घालून गरिबांना शिक्षा दिली आहे. कर्नाटकातील सरकार धन दांडग्याचे आहे. भाजप जगाला काय संदेश देऊ इच्छिते असा सवाल देखील ओवेसी यांनी केला आहे.
भाजपचं स्पष्टीकरण
असे प्रतिबंध यापूर्वी देखील लागू करण्यात आले होते. अनेक सणांच्या वेळी मांस विक्रीवर बंदी घातली जाते.यामध्ये कोणतीही नवीन बाब नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते एस.प्रकाश यांनी दिली आहे .
यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी, बंगळुरु महापालिकेने कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवादरम्यान प्राण्यांची कत्तल आणि मांस विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी केला होता. तसंच बुद्ध पौर्णिमा आणि राम नवमीला देखील बंगळुरु महानगरपालिकेने मांस विक्रीवर बंदी घातली होती.
महापालिकेच्या परिपत्रकात नेमकं काय?
दरम्यान, महापालिकेने मांसविक्रीबाबत जे परिपत्रक जारी केलं आहे, ते स्थानिक कन्नड भाषेतील आहे. या परिपत्रकात म्हटलं आहे की, "बुधवारी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला पशू हत्या आणि मांसविक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा निर्णय संपूर्ण महापालिका हद्दीसाठी लागू असेल. विक्रेते, नागरिकांनी महापालिकेच्या नियमाचं पालन करावं."
Video : बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
संबंधित बातम्या
Belgaum Border Dispute : बेळगाव सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मराठी भाषिकांचं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)