Dhirendra Shastri : बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्रींच्या भावाला अटक, लग्नात बंदूक दाखवून मारहाण केल्याने कारवाई
Dhirendra Shastri : एका लग्न समारंभात बंदूक दाखवून काही लोकांना मारहाण करण्यात आल्याने धीरेंद्र शास्त्री यांच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.
Dhirendra Shastri : मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. एका लग्नसमारंभात बंदूक दाखवून काही लोकांना मारहाण करण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे. याच प्रकरणी शालिग्राम गर्ग यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. 11 फेब्रुवारी रोजी छतरपूर येथील एका लग्न समारंभात शालिग्राम यांच्यासह आणखी काही लोकांनी पिस्तूलचा धाक धाखवून लग्न समारंभातील लोकांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली होती.
अकटेनंतर शालिग्राम यांना मध्य प्रदेशातील छतरपूरच्या जिल्हा न्यायालयात हजर केले असताना त्यांना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याआधी मध्यप्रदेशमधील बामिठा पोलिस ठाण्यात मारहाण आणि एससी-एसटी कायद्यान्वये शालिग्राम त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अकट करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये धीरेंद्र शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम आणि काही लोक लग्न समारंभातील लोकांना पिस्तूल दाखवून धमकावत आहेत. याबरोबरच काही लोकांना मारहाण देखील केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी धमकी देणे आणि मारहाण करण्यात आल्याची तक्रार दाखल केली. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शालिग्राम याच्यासह आणखी काही लोकांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मध्यप्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात 11 फेब्रुवारी रोजी एका लग्न समारंभाची तयारी सुरू होती. त्याचवेळी रात्री 12 वाजण्याच्या आसपास धीरेंद्र शास्त्री यांचा लहान भाऊ शालिग्राम गर्ग हा पिस्तूलासह आपल्या काही साथीदारांसोबत लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहोचला. त्याने तेथे उपस्थित असलेल्या लोकांना बंदुकीचा धाक दाखवला आणि मारहाण केली. मारहाण झालेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणारे सर्व जण मद्य प्राशन केलेले होते. या सर्वांनी प्रथम महिलांना शिवीगाळ केली आणि धमकावले. शिवाय हवेत गोळीबार देखील केला आणि लग्न समारंभ थांबवण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे लग्न समारंभासाठी आलेले नातेवाईत तेथून आपापल्या घरी परतले.
दरम्यान, मारहाण सुरू असताना तेथील काही नागरिकांनी त्याचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शालिग्राम एका हातात सिगागेट आणि दुसऱ्या हातात बंदूक घेऊन लोकांना धमकावत असल्याचे दिसत आहे. त्याने एका व्यक्तीला पकडून बुंदेलखंडचे नृत्य येथे चालणार नाही असं सांगितलं. त्यावेळी तेथील लोकांनी धीरेंद्र शास्त्री यांचे गाणे लावण्यास नकार दिला. त्यामुळे संसयित आरोपींनी उपस्थित लोकांना मारहाण केली आणि धमकावले. या संपूर्ण घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.