एक्स्प्लोर

राममंदिर भूमीपूजनाच्या सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह 'हे' पाच जण!

अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाची तयारी जोरात सुरु आहे. यासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह केवळ पाच जणच उपस्थित राहतील, अशी माहिती मिळाली आहे.

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाची तयारी जोरात सुरु आहे. यासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह केवळ पाच जणच उपस्थित राहतील, अशी माहिती मिळाली आहे. या मुख्य भूमिपूजन सोहळ्या मंचावर केवळ पाच मान्यवर असतील. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचं अयोध्येत येतं आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरचं संकट आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी विशेष अतिथिच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी प्रत्येक खुर्चीमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हँडग्लोज, मास्क आणि सँनिटायझर वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. सध्या राम मंदिर ट्रस्टकडून कोरोना आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक ते सर्व सुरक्षेचे उपाय अयोध्येत करण्यात आले आहेत. पहिलं निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारी यांना राम मंदिर भूमीपूजनाचं पहिलं निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारी यांना पाठवण्यात आलं आहे. त्यांना हे आमंत्रण राम मंदिर ट्रस्टचे महंत चंपत राय यांच्यातर्फे पाठवण्यात आलं आहे. इक्बाल अंसारी यांच्यासह मुस्लिम पक्षकार  हाजी महबूब यांना देखील निमंत्रण दिलं आहे. तसंच बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण मिळाल्यावर अंसारी म्हणाले की, या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालं आहे. याचा फार आनंद आहे. मी या कार्यक्रमात नक्की सहभागी होणार आहे. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने ही जागा रामललाच्या भव्य मंदिरासाठी दिली आहे. आता यासंदर्भात कुठलाही वाद नाही. ते म्हणाले की, मी नेहमी साधुसंतांमध्ये राहिलो आहे. माझ्या मनात प्रभू रामांविषयी आदर आहे. त्यांनी म्हटलंय की, कदाचित  भगवान रामांची इच्छा असावी की, मंदिर भूमि पूजनाचं पहिलं निमंत्रण मला मिळावं, मी याचं स्वागत करतो. अयोध्येमध्ये होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याची सुरुवात आजपासून झाली. आज सकाळी 9 वाजता गणपती पूजन झालं.  उद्या, मंगळवारी रामर्चा पूजन होईल. ही पूजा सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. ही पूजा जवळपास 5 तास सुरु राहील. यात 6 पुजाऱ्यांचा समावेश असेल. तर 5 ऑगस्टला बुधवारी, शुभमुहुर्तावर राममंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम होईल. या पूजेला देखील मर्यादित पुजाऱ्यांचा समावेश असेल.

भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत

राम जन्मभूमीच्या पुजाऱ्यासह सुरक्षेतील 16 पोलिसांना कोरोनाची लागण

भूमिपूजनाच्या तयारीच्या गडबडीत याठिकाणी कोरोनाची एंट्री झाली आहे. राम जन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास (Priest Pradeep Das) यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. प्रदीप दास देखील सत्येंद्र दास यांच्यासह राम जन्मभूमीची पूजा करतात. राम जन्मभूमीमध्ये मुख्य पुजाऱ्यांसह अन्य चार पुजारी रामललाची सेवा करतात.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुजारी प्रदीप दास यांना होम क्‍वारंटाईन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राम जन्मभूमीच्या सुरक्षा व्यवस्थेतील 16 पोलिस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या आधी पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार वाढल्याने खळबळ उडाली आहे. Exclusive | राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रम कसा असणार? किती जण उपस्थित राहणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येला  ऐतिहासिक राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अयोध्येला पोहचणार आहेत. नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर 5 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता अयोध्येतील साकेत महाविदयालयाच्या पटांगणात उतरेल. यानंतर ते पहिल्यांदा हनुमान गढीला किंवा राम जन्मभूमीकडे जातील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. परंतू सध्या चर्चा अशी आहे की, राम जन्मभूमीच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक तास संबोधन करणार आहेत. ज्याचं प्रसारण अयोध्येत ठिकठिकाणी एलईडी स्क्रिन लाऊन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येपासून फैजाबादपर्यंत लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मंत्रच्चोर ऐकू येणार आहे. Ram Mandir Ayodhya | राम मंदिरासाठी चांदीच्या विटा नको, पैसे द्या, राम मंदिर ट्रस्टचं लोकांना आवाहन शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन सकाळी राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर रात्री शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्येत मोठं मोठे कटआऊट लावण्यात येणार आहेत. हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक सोहळा करण्यासाठी आता भाजपकडून मोठया प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत.

हे ही वाचा- 

Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही

राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली? 

भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत

Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP On Mahapalika Election |  मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special ReportNew India Bank Scam | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक कुणामुळे डुबली? Special ReportShanishingnapur Shanidev | एक मार्चपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलानंच अभिषेक Special ReportSpecial Report Suresh Dhas:Dhananjay Munde यांच्या भेटीमुळे विश्वासार्हतेला तडा, विरोधकांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.