Azam Khan Health : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान रुग्णालयात, प्रकृती बिघडल्याने सर गंगाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल
Azam Khan Health Update: सर गंगाराम रुग्णालयात (sir Ganga Ram Hospital) त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
Khan Heath Bulletin: समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान (Azam Khan) यांची अचानक बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर गंगाराम रुग्णालयात (sir Ganga Ram Hospital) त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. सर गंगाराम रुग्णालयाच्या उपाध्यक्ष डॉ. बीबी अग्रवाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, लवकरच आझम खान यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे
आझम खान यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना डॉ. बीबी अग्रवाल म्हणल्या, "आझम खान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात दखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे." गेल्या वर्षी देखील मे महिन्यात नियमित तपासणीसाठी आझम खान यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Delhi | Azam Khan who was admitted today morning with a complicated Hernia in emergency is stable. He is presently off blood thinners because of recent heart stenting and will be operated on soon for Hernia: Dr B B Aggarwal, Vice Chairman, Laproscopic, Laser & General Surgery,…
— ANI (@ANI) April 17, 2023
आझम खान रामपूर मतदारसंघातून 10 वेळा आमदार म्हणून निवडून आले
आझम खान सध्या उत्तर प्रदेशातील सीतापूर तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. बेताल वक्तव्यांमुळे खासदार आझम खान कायम चर्चेत असायचे. लोकसभा अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. आझम खान रामपूर मतदारसंघातून 10 वेळा आमदार म्हणून निवडून आले. 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीतही आझम खान रामपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. तुरुंगात असताना त्यांनी ती निवडणूक लढवली होती, पण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व गमवावे लागले. एका सभेनंतर आझम यांनी रामपूर येथे नियुक्त प्रशासकीय अधिकारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यामुळे एप्रिल 2019 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या :