एक्स्प्लोर

Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremony: केशरी रंग, 22 फूट लांब, बटन दाबताच राम मंदिराच्या शिखरावर पोहोचणार; आज नरेंद्र मोदींच्या हस्ते रामध्वजारोहण

Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremony: उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremony: उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर (Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremon) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या सोहळ्याची अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या शिखरावरील भव्य ध्वज 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा आहे. या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती  असणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 ते 12.30 दरम्यान ध्वजारोहण करतील. या ध्वजावर भगवान श्री रामांच्या तेजस्वी आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्य तसंच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह "ओम" लिहिलेलं आहे. अयोध्या शहरातील अनेक भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अयोध्या नगरीत मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. देशभरातून अनेक भाविक अयोध्या नगरीत दाखल होत आहेत.

नरेंद्र मोदी सप्तमंदिरालाही भेट देणार- (Ayodhya Flag Hoisting)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजताच्या सुमाराला महर्षि वसिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, महर्षि वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांच्याशी संबंधित मंदिरांचा समावेश असलेल्या सप्तमंदिराला भेट देतील. यानंतर ते शेषावतार मंदिरालाही भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान माता अन्नपूर्णा मंदिराला भेट देतील. यानंतर, ते राम दरबार गर्भगृहात दर्शन आणि पूजा करतील, त्यानंतर ते रामलल्ला गर्भगृहात दर्शन करतील. दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला, पंतप्रधान अयोध्येतील पवित्र श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवतील.

रामध्वजारोहणाचा कार्यक्रम कसा असेल? (Ram Mandir Flag Hoisting Ceremony)

  1. 161 फूट उंचीच्या शिखरावर 42 फूट उंचीची रामध्वजा असेल
  2. रामध्वजा जमिनीपासून 191 फूट उंचीची असेल 
  3. रामध्वजेचे दोरी आणि मशिनने शिखरावर आरोहण 
  4. रामध्वजा केशरी रंगाची, 11 फूट रुंद आणि 22 फूट लांब असेल
  5. बटन दाबताच रामध्वजा दोरीवरुन वरच्या टोकाला पोहचून फडकेल 

असे बनले राम मंदिर- (Ayodhya Ram Mandir Flag Hoisting)

  1. 9 नोव्हेंबर 2019- राम मंदिर निर्माणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, ट्रस्टद्वारे बांधकामाचे आदेश
  2. 5 फेब्रुवारी 2020- श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा
  3. 5 ऑगस्ट 2020- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे भूमीपूजन 
  4. 20 ऑगस्ट 2020- राममंदिराचे काम प्रत्यक्षात सुरू 
  5. 22 जानेवारी 2024- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरात राममूर्तीची प्रतिष्ठापना
  6. 5 जून 2025- राम मंदिराच्या दरबारात अन्य सात देवी देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना
  7. 25 नोव्हेंबर 2025- मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण

संबंधित बातमी:

Ayodhya : अयोध्या राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते समारंभ

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget