एक्स्प्लोर

Ayodhya : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, तामिळनाडूतून ई-मेल आला, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

Ayodhya Ram Temple Threat : दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. गुप्तचर यंत्रणांनीही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तशा आशयाचा एक ई मेल अयोध्या राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डीएमना आला आहे. सोमवारी रात्री हा धमकीचा ई मेल आला होता. या प्रकरणी अयोध्येच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा ई मेल तामिळनाडूतून आल्याची माहिती आहे.

सोमवारी रात्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या मेलवर धमकीचा मेल आला होता. 'मंदिराची सुरक्षा वाढवा' असं त्यामध्ये लिहिण्यात आलं होतं. धमकीचा मेल मिळाल्यानंतर व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली. राम मंदिर ट्रस्टने एफआयआर दाखल केला आहे. 

धमकीचा मेल तामिळनाडूतून 

अयोध्येसोबतच बाराबंकी आणि चंदौलीसह इतर अनेक जिल्ह्यांनाही धमकीचे मेल आले आहेत. बाराबंकी आणि चंदौलीच्या डीएमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. अयोध्या आणि इतर जिल्ह्यांना पाठवलेला धमकीचा मेल हा तामिळनाडूतून आला असल्याची माहिती आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर सायबर सेल पाठवलेल्या ईमेलची चौकशी करत आहे

देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट 

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. या प्रकरणी गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. 

मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था

राम मंदिराच्या सुरक्षेसाठी आधीच तैनात असलेल्या CRPF आणि UPSSF च्या तुकड्या आणखी मजबूत करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून मंदिर परिसरावर नजर ठेवली जात आहे. प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. गुप्तचर यंत्रणाही संभाव्य धोक्याची चौकशी करत आहेत. प्रशासनाने भाविकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे. 

या आधीही धमक्या

अयोध्येतील राम मंदिराला धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेबर 2024 मध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर धमकी दिली होती. त्यानंतर त्याला बिहारच्या भागलपूरमधून अटक करण्यात आली होती. जानेवारी 2024 मध्ये प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच अनेक धमक्या आल्या होत्या. या घटनांमुळे प्रशासन नेहमीत सतर्क असते. यावेळीही सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget