एक्स्प्लोर

अयोध्या प्रकरण । मध्यस्थ कमिटीकडून तोडगा निघत नसेल तर 25 जुलैपासून पुन्हा सुनावणी : सर्वोच्च न्यायालय

समितीने आपला अहवाल सादर करावा अन्यथा 25 जुलैपासून सुनावणीला सुरुवात होईल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मध्यस्थांच्या समितीकडून या प्रश्नावर जो तोडगा काढला होता त्याने कुणाचेही समाधान झालेले नाही असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.

नवी दिल्ली : अयोध्या राम मंदिर-बाबरी मशीद वादावर मध्यस्थ समितीकडून निराशा झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा 25 जुलैपासून सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे.  या प्रकरणी नेमलेल्या मध्यस्थी कमिटीचा अहवाल एका आठवड्याच्या आत देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. हा अहवाल पाहूनच 25 जुलैपासून सुनावणीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने मध्यस्थ कमिटीचे अध्यक्ष न्यायाधीश कालीपुल्ला यांना आतापर्यंत केलेल्या अभ्यासाबाबत 18 जुलैपर्यंत अहवाल देण्याचे सांगितले आहे. या वादातून तोडगा काढण्यासाठी आम्ही मध्यस्थांची समिती नेमली आहे. या समितीने आपला अहवाल सादर 18 जुलैपर्यंत करावा. मध्यस्थी करूनही तोडगा निघत नसल्यास 25 जुलैपासून सुनावणी सुरु केली जाईल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.  मध्यस्थांच्या समितीकडून या प्रश्नावर जो तोडगा काढला होता त्याने कुणाचेही समाधान झालेले नाही असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. यातून कुठलाही तोडगा निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे कमिटीच्या अहवालाची 15 ऑगस्टपर्यंत वाट पाहणे वेळखाऊ आहे. कोर्टाने मध्यस्थ कमिटी बंद करून सुनावणी सुरु करावी, असे याचिकाकर्त्यांचे वकील  के. परासरन यांनी कोर्टात सांगितले. परासरन यांच्या या मुद्याचे समर्थन रामलला विराजमान आणि निर्मोही आखाड्याच्या वकिलांनी देखील केले. मात्र मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी या अर्जाला विरोध केला.  स्वतः कोर्टाने या मध्यस्थ समितीची नियुक्ती केली. कमिटीला काम करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत वेळ दिला. आता एक पक्षकार असंतुष्ट असल्याने पूर्ण प्रक्रिया रद्द केली जाऊ शकत नाही. दुसरे पक्षकार या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत असून कोर्टाने याला अनुमती द्यावी, अशी बाजू धवन यांनी मांडली. यावर चीफ जस्टीस रंजन गोगोई यांनी म्हटले की, आम्ही मध्यस्थ समितीची बाजू ऐकून घेऊ इच्छितो. यामुळे आम्ही मध्यस्थ समितीचे अध्यक्ष जस्टिस कलिफुल्ला यांना विनंती करतो की त्यांनी 18 जुलैपर्यंत समितीचा अहवाल द्यावा. अध्यक्षांनी आम्हाला सांगावं की मध्यस्थता प्रक्रियेत काय प्रगती झाली. जर कलिफुल्ला यांनीही मध्यस्थी करूनही यावर तोडगा निघत नसल्याचे मान्य केल्यास आम्ही 25 जुलैपासून या प्रकरणी सुनावणी सुरु करू, असे गोगोई यांनी स्पष्ट केले. यावर्षी मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टाने  मध्यस्थी करून काही मार्ग काढण्याच्या उद्देशाने एका तीन सदस्यीय समितीचे गठन केले होते. सुरुवातीला या समितीने कामासाठी आठ आठवड्याचा वेळ मागून घेतला होता. मात्र यानंतर समिती अध्यक्षांनी पुन्हा 15 ऑगस्टपर्यंत वेळ मागून घेतली होती. संबंधित बातम्या

अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद : सुप्रीम कोर्टाने सुनावणी तीन महिन्यांसाठी पुढे ढकलली 

अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद : सुप्रीम कोर्टाकडून मध्यस्थी नेमण्याबाबतचा निकाल 

VIDEO | अयोध्या प्रकरणी मध्यस्थांची मध्यस्थी सर्वमान्य होईल? | माझा विशेष | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Gitanjali Angmo : 'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
E20 Petrol : पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget