एक्स्प्लोर
बेळगावात उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न
राज्याची निर्मिती झाल्यापासून उत्तर कर्नाटकाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. उत्तर कर्नाटकच्या तुलनेत दक्षिण कर्नाटकचा विकास अधिक झाला आहे. नेहमी उत्तर कर्नाटकला विकासापासून डावलले जाते असा उत्तर कर्नाटकातील जनतेची भावना झाली आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य म्हणून घोषणा करावी अशी मागणी अलीकडील काळात जोर धरू लागली आहे.
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून सीमाभागात घडलेल्या घटनांमुळे बेळगाव शहर चर्चेत आले आहे. त्यात आता भर पडली आहे ती उत्तर कर्नाटक राज्याचा स्वतंत्र ध्वज फडकविण्याच्या घटनेने. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज फडकवणाऱ्या कार्यकर्त्यांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
राज्याची निर्मिती झाल्यापासून उत्तर कर्नाटकाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. उत्तर कर्नाटकच्या तुलनेत दक्षिण कर्नाटकचा विकास अधिक झाला आहे. नेहमी उत्तर कर्नाटकला विकासापासून डावलले जाते असा उत्तर कर्नाटकातील जनतेची भावना झाली आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य म्हणून घोषणा करावी अशी मागणी अलीकडील काळात जोर धरू लागली आहे.
उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य म्हणून घोषणा करावी अशी मागणी उत्तर कर्नाटक आंदोलन समितीने केली होती. उत्तर कर्नाटक आंदोलन समितीने एक जानेवारी रोजी उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्याचा ध्वज फडकविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हिरेबागेवाडी येथे वेगळ्या उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न केला जात असताना पोलिसांनी धाव घेऊन वेगळ्या राज्याचा ध्वज फडकवणाऱ्या व्यक्तींना अटक केली आहे. उत्तर कर्नाटक आंदोलन समितीचे अध्यक्ष अडीवेश इटगी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी कन्नड ध्वजाचे दहन केल्याचे पडसाद बेळगावात उमटले होते. तसेच भीमाशंकर पाटील या कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱ्याने महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्याविषयी वक्तव्य केले होते. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शनिवारी आंदोलन केले होते. त्याची बातमी बेळगावात पोहोचल्यावर कन्नड संघटनांनी एकत्र येऊन सर्किट हाऊस परिसरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. यावेळी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या होत्या.
पाहा व्हिडीओ : शिवसेना खासदार धैर्यशिल मानेंचा कर्नाटक नवनिर्माण सेनेला इशारा
शिवसेना खासदार धैर्यशील माने यांचा इशारा :
महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे. असा इशारा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला दिला आहे. तसेच, या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याचंही धैर्यशील मानेंनी म्हटलं होतं. तसेच या विकृत संघटनेवर बंदीची घालण्याचीही मागणी धैर्यशील माने यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी : धैर्यशील माने
बेळगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; शिवसेना, कनसे वाद चिघळण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement