एक्स्प्लोर

अयोध्या वाद : सुप्रीम कोर्टाचा कोणताही निर्णय आम्हाला मान्य - अशरफ मदनी

अतिशय संवेदनशील अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही दिवसांत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जमीयत उलेमाए हिंदचे अध्यक्ष अशरफ मदनी यांनी कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीसंदर्भातील वादावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही दिवसांत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटना जमीयत उलेमाए हिंदचे अध्यक्ष अशरफ मदनी यांनी यावर भाष्य केले आहे. न्यायालयाचा कोणताही निर्णय आम्हाला मान्य आहे. याआधीच उत्तर प्रदेशसह देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. रामजन्मभूमी व बाबरी मशिद या विषयावर माननीय सुप्रीम कोर्टाकडून पुढील काही दिवसांत निकाल अपेक्षित आहेत. त्यामुळे यावरुन काही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपुर काळजी घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कालच (५ नोव्हेंबर)ला भाजप मुख्यालयातून पक्षाचे कार्यकर्ते आणि राज्यातील आयटी सेल प्रमुखांना गाईडलाइन्स जारी करण्यात आले आहे. काय म्हणाले अशरफ मदनी? पुरावे आणि साक्ष यांच्या आधारावर सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे. याचवेळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोक भीतीच्या सावटाखाली असल्याचेही ते म्हणाले. मदनी म्हणाले, ''हे प्रकरण कायदेशीर आहे. 400 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मशिदीची लढाई आम्ही लढलोय. आम्हाला वाटतंय की निर्णय आमच्याच बाजूने लागेल. मात्र, आम्ही नेहमीच म्हणालोय की हा देश आमचा आहे, कोर्ट आमचे आहे, कायदा आमचा आहे. त्यामुळं आम्ही निर्णय घेतलाय की जो कोर्ट निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. या प्रकरणी देशातील प्रत्येक नागरिकाने कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा आणि देशात शांती प्रस्थापित करावी". निर्णयाआधी अयोध्येत अलर्ट - पुढील काही दिवसांत अयोध्या वादावर निर्णय येणार आहे. अयोध्येत 14 कोसी परिक्रमेला मंगळवापासून सुरुवात झाली आहे. हजारो श्रद्धाळू अयोध्येत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे प्रशासन हाय अलर्टवर आहे. सरन्यायाधीश गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्याधीच निर्णय येण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. 14 कोसी आणि पंच कोसी परिक्रमेसाठी निमलष्करी दलासोबतच PAC (Provincial Armed Constabulary)लाही तैनात करण्यात आले आहे. सोबतच सोशल मीडियावरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. तर, केंद्र सरकारने CRPF च्या 4 हजार जवानांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget