Ashish Mishra Bail: लखीमपूर खेरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून आशिष मिश्राला जामीन, मात्र घातल्या 'या' अटी
Ashish Mishra Bail: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
Ashish Mishra Bail: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयानं आशिष मिश्रावर काही अटी घातल्या आहेत. आशिष मिश्राला दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये राहता येणार नसल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. आशिष मिश्राला आठ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
चार शेतकऱ्यांचाही जामीन मंजूर
मागील वर्षी लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थार गाडीखाली चिरडण्यात आल्याची घटना घडली होती. यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतक पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपींना बेदम मारहाण करणाऱ्या चार शेतकऱ्यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
आठवडाभरातच उत्तर प्रदेश सोडावं लागणार
जामिनावर सुटल्यानंतर आशिष मिश्राला आठवडाभरात उत्तर प्रदेश सोडावं लागणार आहे. तसेच आशिष मिश्राला त्याचा राहण्याचा पत्ता पोलिसांना सांगावा लागणार आहे. तसेच दररोज त्याला पोलिस ठाण्यात रिपोर्ट करावा लागणार असल्याची अट सर्वोच्च न्यायालयानं घातली आहे. साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव ते टाकू शकत नाहीत, असं न्यायालयानं म्हटलं आहे. तसेच आशिष मिश्राला कोणत्याही साक्षीदाराला भेटता येणार नसल्यासही न्यायालयानं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: