एक्स्प्लोर
SBI मध्ये एकाच दिवसात हजारो कोटी जमा
मुंबई: जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलल्यानंतर आता बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये जमा होते आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयमध्ये काल एका दिवसात 18 हजार कोटी जमा झाले असून सेव्हिंग अकाऊंटमध्ये अकरा हजार कोटी, तर करंट अकाऊंटमध्ये 7 हजार कोटी जमा झाले आहेत.
एसबीआय बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली. त्या आज मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
एसबीआयचे एटीएम पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आखणी तीन - चार दिवस लागणार आहेत, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पेट्रोल नाही
आज मध्यरात्रीपासून पाहटे सहा वाजेपर्यंत तुम्हाला मुंबईत पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. मुंबई पेट्रोल-डिझेल असोशिएनशनं हा निर्णय घेतलाय.
आज मध्यरात्रीपर्यंत पेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. मात्र मध्यरात्रीपासून नव्या पाचशे आणि हजारांच्या नोटांवर व्यवहार होणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर वाद होऊ शकतो. असा दावा असोशिएशनं केलाय.
त्यामुळे मुंबईकरांसाठी आज मध्यरात्री बारापासून पाहटे सहा वाजेपर्यंत पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही. पण सकाळी व्यवहार सुरळीत सुरु राहतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement