एक्स्प्लोर
पाकच्या हद्दीत घुसून जशास तसे उत्तर द्या, सैन्यातून मागणी
नवी दिल्ली : सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या भ्याड हल्ल्यांविरोधात भारतीय सैन्यातही संतापाची लाट उसळली आहे. आता पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करुन जशास तसं उत्तर देण्याची वेळ आल्याची भावना भारतीय सैन्य दलाकडून व्यक्त केली जात आहे.
सीमारेषेवर अतिरिक्त कुमक पाठवून भारत सरकारनं नेहमी होणाऱ्या या हल्ल्यांविरोधात ठोस पावलं उचलावीत, असं मत सैन्यदलाकडून व्यक्त केलं जात आहे. 26/11 ते पठाणकोट हल्ला, आणखी किती सहन करायचं असा सवाल सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं. पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला किंवा सीमेत कोणी पाऊल ठेवलं तर आण्विक हल्ला करण्यासाठीही घाबरणार नाही, असं आसिफ यांनी म्हटलं आहे.
उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताला 17 जवान गमवावे लागले आहेत. बारामुल्ला जिल्ह्यातील जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला करण्यात आला होता.
महाराष्ट्रानेही या हल्ल्यात तीन सुपुत्र गमावले आहेत. लान्स नायक जी शंकर साताऱ्याच्या जाशी गावचे आहेत, तर टी. एस. सोमनाथ नाशिकच्या खंडनगळीचे होते. यूके जानराव अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते.
संबंधित बातम्या :
उरीमधील भ्याड हल्ल्यात भारताने कोणाला गमावलं?
उरी हल्ल्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा, तीन सुपुत्र शहीद
जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद
उरी हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच, भारतीय लष्कराची माहिती
पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement