(Source: Poll of Polls)
Army Aircraft Crash: राजस्थानात लष्कराचं MIG-21 विमान घरावर कोसळलं, दोघांचा मृत्यू
Army Aircraft Crash: लष्कराचं विमान घरावर कोसळलं असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पायलट आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.
Army Aircraft Crash : राजस्थानात लष्कराचं MIG-21 विमान कोसळलं आहेय हनुमानगड गावातल्या बहलोल नगरमध्ये विमान कोसळलं आहे. लष्कराचं विमान घरावर कोसळलं (Army Aircraft Crash) असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पायलट आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. तर दोन महिलांचा मृत्यू झााला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिकला एअरलिफ्ट करण्यत आले आहे. पायलटला एअरलिफ्ट करण्यासाठी वायूसेनेचे एमआय17 पाठवण्यत आले. मिग 21 ज्या घरावर जाऊन कोसळले त्या घरामध्ये तीन महिला आणि एक पुरूष उपस्थित होता. दोन महिलांचा जागेवर मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
MiG-21 aircraft crashes in Rajasthan's Hanumangarh; at least two civilian casualties reported, pilot safe: Police
— Press Trust of India (@PTI_News) May 8, 2023
आतापर्यंत किती विमान कोसळले?
या अगोदर जानेवारी महिन्यात राजस्थानच्या भरतपूरमध्ये ट्रेनिंग दरम्यान दोन भारतीय सेनेचे फायटर जेट एक सुखोई एसयू-30 आणि एक मिराज 2000 यांचा अपघात झाला. या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला. एक विमान मध्यप्रदेशच्या मुरैना येथे तर दुसरे विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये उतरवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात जम्मू काश्मिरच्या किश्तवाड जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होत. एप्रिल महिन्यात कोच्चीमध्ये ही दुर्घटना झाली आहे.
पाहा व्हिडीओ
#WATCH भारतीय वायुसेना का मिग-21 लड़ाकू विमान आज सुबह राजस्थान के हनुमानगढ़ के पास दुर्घटनाग्रस्त हो गया जिसमें 2 स्थानीय महिलाओं की मृत्यु हो गई। पायलट को हल्की चोटें आई हैं मगर वो सुरक्षित है। pic.twitter.com/heIX3KiRkf
— ANI_HindiNews (@AHindinews) May 8, 2023
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरचा अपघात
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अरूणाचल प्रदेशात लष्कराचे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या. 5 ऑक्टोबर 2022 साली अरूणाचल प्रदेशच्या तवांग परिसराक चित्ता हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. ज्या अपघातात लष्करातील एका वैमानिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसात 21 ऑक्टोबरला भारतीय सेनेच्या एविएशन अॅडव्हान्सड लाईट हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, तूतिंगपासून 25 किलोमीटर सियांग गावाजवळ हा अपघात झाला.
हेही वाचा:
Army Helicopter Crash: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे हॅलिकॉप्टर कोसळले