Army Helicopter Crash: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे हॅलिकॉप्टर कोसळले
Army Helicopter Crash: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये हॅलिकॉप्टर कोसळले असून या हॅलिकोप्टरमध्ये दोन ते तीन जण होते.
Army Helicopter Crash: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) किश्तवाड (Kishtwar) जिल्ह्यातील मारवाह तालुक्यातील मछना गावाजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर (Army Helicopter) कोसळले आहे. अपघात (Accident) झाला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघातात पायलट जखमी झाले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
"जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवारजवळ लष्कराचे ALH ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. पायलट जखमी झाले असले तरी त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. तसेच पुढील तपास देखील सुरु आहे", असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
नेमका कसा झाला अपघात?
भारतीय लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर कसे कोसळले? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, खराब हवामानामुळे अपघात झाला असावा असं बोललं जात आहे. जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांत गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पाऊसही पडत आहे. त्यामुळे हा अपघात खराब हवामानामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
वृत्तानुसार, या हॅलिकोप्टरचा अपघात गुरुवारी सकाळी झाला आहे. .काश्तवाड जिल्ह्यातून वाहणाऱ्या मारुसुदार नदीमध्ये या हॅलिकॉप्टरचे अवशेष सापडले. या अपघाताचा पुढील तपास सध्या संबंधित अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
तसेच मार्चमध्ये दोन भारतीय लष्काराच्या पायलटचा मृत्यू झाला होता. भारतीय लष्कराच्या चिता या हॅलिकॉप्टरचा अपघात 16 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशमधील मंडाला पर्वतरांगांजवळ झाला होता. यानंतर भारतीय लष्कराची या अपघातासंदर्भात शोधमोहीम सुरु झाली. ही शोधमोहीम भारतीय लष्कराच्या सशस्त्र सीमा बल (SSB) आणि स्थानिक पोलीसांच्या मदतीने करण्यात आली. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या हॅलिकॉप्टरचा जेव्हा अपघात झाला तेव्हा ऑपरेशनल सॉर्टी सुरु होते. भारतीय लष्कराचे हॅलिकॉप्टर चिता हे त्यावेळी या ऑपरेशनचा एक भाग होते. ऑपरेशन चिताचा अपघात झाल्यानंतर महिनाभराच हॅलिकॉप्टर ध्रुवचा अपघात झाला आहे.
हॅलिकॉप्टर ध्रुव संदर्भात सध्या चौकशी सुरु असून या चौकशीतून काय बाहेर येईल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.
An Army ALH Dhruv Helicopter crashed near Kishtwar, Jammu & Kashmir. Pilots have suffered injuries but are safe. Further details awaited: Army Officials. pic.twitter.com/ya41m7CRfn
— ANI (@ANI) May 4, 2023
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Cyclone Mocha : अस्मानी संकट! वर्षातील पहिले चक्रीवादळ धडकणार, बंगाल - ओडिसाला हाय अलर्ट जारी