एक्स्प्लोर
सूरतमध्ये 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीकडून मुलीची निर्घृण हत्या
कठुआ, उन्नाव आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेतील सूरतमध्ये बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.

सूरत : कठुआ, उन्नाव आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेतील सूरतमध्ये बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. देशात बलात्काराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. सूरतमध्येही एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्येची घटना घडली आहे. या मुलीवर तब्बल ८ दिवस अत्याचार करुन, नराधमानी तिची निर्घृण हत्या केली आहे. ६ एप्रिलला सूरतमधल्या पांडेसरा भागात एका क्रिकेट ग्राऊंडजवळ या चिमुकलीचा मृतदेह आढळला होता. या घटनेतल्या आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठत मुलीला प्रचंड यातना दिल्याचं तिच्या मृतदेहावरुन लक्षात येत आहे. कारण या ८ वर्षाच्या मुलीच्या अंगावर ८० पेक्षा जास्त जखमांच्या खुणा आढळून आल्याचं समजतं आहे. पण अजूनही या मुलीची ओळख मात्र पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा























