एक्स्प्लोर
नाराजी दूर करण्यासाठी अमित शाह लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींच्या घरी
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पक्षातील दोन्ही ज्येष्ठ नेते सध्या पक्षावर आणि अमित शाह यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच दोन्ही दोन्ही नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी शाह सध्या प्रयत्न करत आहेत.
भारतीय जनता पक्षाने लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दोन्ही नेत्यांना लोकसभेचे तिकीट दिले नाही. अडवाणी यांच्याऐवजी गांधीनगर मतदारसंघातून अमित शाह यांना तिकीट देण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला मुरली मनोहर जोशी यांच्याऐवजी कानपूरमध्ये सत्यदेव पचौरी यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.
मुरली मनोहर जोशी यांनी एका भावनिक पत्राद्वारे पक्षावर नाराजी व्यक्त केली तर अडवाणी यांनी ब्लॉगद्वारे नाराजी उघड केली. अडवाणी आणि जोशी यांचे तिकीट कापल्यामुळे विरोधकांनी भाजपवर टीका करणे सुरु केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने या गोष्टीवरुन भाजपला लक्ष्य करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील अडवाणींचा मुद्दा उचलून मोदी-शाह जोडीला लक्ष्य केले.
ऐन निवडणुकीच्या दरम्यान पक्षांतर्गत सुरु असलेले नाराजीनाट्य थांबवण्यासाठी अमित शाह यांनी थेट अडवाणी आणि जोशी यांचे घर गाठले. शाह यांनी अडवाणी आणि जोशी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची मनधऱणी करण्याचा प्रयत्न केला.
सुमित्रा महाजनही पक्षावर नाराज
लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजनदेखील पक्षावर नाराज आहेत. इंदूरमधून उमेदवार घोषित न केल्याने नाराज झालेल्या महाजन यांनी स्वतःहून निवडणुकीत माघार घेतली आहे. दरम्यान महाजन यांच्या इंदूर मतदार संघात भाजपने उमेदवार बदलला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
करमणूक
Advertisement