एक्स्प्लोर

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त; इतर राज्यांतून मागवल्या 45 निमलष्करी तुकड्या, CRPF वर सुरक्षेची मुख्य जबाबदारी

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून निमलष्करी दलाच्या 45 तुकड्यांवर सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे.

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रा म्हणजेच बाबा बर्फानी (Baba Barfani) यांच्या यात्रेची तयारी सध्या जोरात सुरू आहे. 1 जुलैपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. अमरनाथ यात्रा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि रणनिती तयार करण्यात आली असून त्यावर काम सुरू आहे. अमरनाथ यात्रा भक्तिमय आणि सुरक्षित पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

अमरनाथ यात्रेसाठी इतर राज्यांतील निमलष्कराच्या 45 तुकड्यांना पाचारण

गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून तयार केली जात आहे. यात्रेच्या सुरक्षेसाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या (Central Paramilitary Forces) 45 तुकड्या इतर राज्यांतून मागवण्यात आल्या असून त्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात येईल. जूनपासून निमलष्करी दलाच्या तुकड्यांची तैनाती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

1 जुलैपासून सुरु होणार अमरनाथ यात्रा

अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची तपासणी (Inspection of Vehicles) केली जाणार आहे. कोणत्याही अनधिकृत ठिकाणी भाविकांना वाहनं थांबवता येणार नाहीत. श्री अमरनाथची पवित्र गुहा तसेच बाबा बर्फानी या नावाने प्रसिद्ध श्री अमरेश्वर धामची अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होत आहे.

सीआरपीएफकडे सुरक्षेची मुख्य जबाबदारी

सीआरपीएफ (CRPF) आणि पोलीस यात्रेकरूंच्या ताफ्याच्या आणि बेस कॅम्पच्या सुरक्षेची काळजी घेतील. स्टिकी बॉम्ब आणि भूसुरुंगांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी लष्कराची रोड ओपनिंग पार्टी (ROP) तुकडी यात्रेच्या मार्गावर तैनात असेल. भाविकांच्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होईल आणि 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवसी संपेल. यात्रेच्या सुरक्षेची मुख्य जबाबदारी सीआरपीएफकडे (CRPF) देण्यात आली आहे.

अमरनाथ भगवान शंकराच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक

अमरनाथ गुहा काश्मीरच्या बर्फाळ पर्वतांमध्ये वसलेली आहे. या गुहेत बर्फापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केली जाते. अमरनाथ गुहा हे भगवान शंकराच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानलं जातं. यंदाच्या यात्रेची तयारी आणि व्यवस्थेबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था आणि रणनिती आखण्याचं काम सध्या सुरु आहे.

यात्रेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू

यंदाची अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होत असून रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. सरकारने 10 एप्रिल रोजी अमरनाथ यात्रेचे वेळापत्रक जाहीर केलं होतं. अमरनाथ यात्रेचा हा प्रवास 62 दिवस चालणार आहे. यात्रेसाठी 17 एप्रिलपासून ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे. अमरनाथ यात्रा 2023 साठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी भाविकांचं वय 13 ते 75 वर्षे दरम्यान असावं. यासोबतच जर एखादी महिला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ गरोदर असेल तर त्यांना यात्रेसाठी परवानगी देण्यात येणार नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन सज्ज, जम्मू काश्मीरच्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
Embed widget