एक्स्प्लोर

रॉचे माजी प्रमुख म्हणतात, 'देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा जरुर बनेल' 

देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा (Maratha) जरूर बनेल, असं वक्तव्य रॉचे माजी प्रमुख आणि संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी अमरजीत सिंह दुल्लत (AmarjitSingh Dullat) यांनी केलं आहे.

नवी दिल्ली : देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा (Maratha) जरूर बनेल, असं वक्तव्य रॉचे माजी प्रमुख आणि संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी अमरजीत सिंह दुल्लत (AmarjitSingh Dullat) यांनी केलं आहे.  दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुण्यातील सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. अमरजीतसिंह दुल्लत म्हणाले की, पुढील पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठाच बनेल. आपल्याला देशासाठी संत नामदेव शोधावा लागेल, असंही ते म्हणाले. संत नामदेव महाराजांचं काम विश्वव्यापी आहे. अशा महान संताच्या नावानं पुरस्कार मिळणं माझं भाग्य आहे, असंही ते म्हणाले. 

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह मलिक आणि राँ चे माजी प्रमुख अमरजित सिंह दुलत यांना संत नामदेव पुरस्कार दिला गेला. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार होता पण पवार सोहळ्याला अनुपस्थित होते. पण जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी अचानक या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

शेतकरी आज ना उद्या क्रांती केल्याशिवाय राहणार नाही- राज्यपाल सत्यपाल मलिक

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, या देशातला शेतकरी अजाणतेपणी रोज गरीब होत असतो. तो जे पीकवतो ते धान्य दिवसेंदिवस स्वस्त आणि त्याच्या गरजेच्या वस्तू महाग होत चालल्यात.  शेतकऱ्यांबद्दल माझं काम संपलेलं नाही. निवृत्त झाल्यानंतरही आवाज उठवत राहणार आहे, असं ते म्हणाले. सत्तेच्या नशेत गुंग असलेल्यांनी लक्षात ठेवा या देशातला शेतकरी आज ना उद्या क्रांती केल्याशिवाय राहणार नाही, असंही मलिक म्हणाले. मलिक म्हणाले की, महाराष्ट्र शौर्य, लढाई, संघर्षासाठी ओळखला जातो तसंच संतांसाठीही ओळखला जातो. संत नामदेव पुरस्कार मला मिळाला हे माझं भाग्य समजतो, असं मलिक म्हणाले.  

देशाला भूक मारणार नाही तर द्वेष मारेल - फारुख अब्दुल्ला
यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं की, या देशाला भूक मारणार नाही तर द्वेष मारेल. भारताला प्रेमानं वाचवायचंय, मरणाआधी असा हिंदुस्थान पाहायचा आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, 80 टक्के भारत शेतकरी आहे. आपण कधीकाळी जनावरांनाही खाऊ घालू नये असं अन्न खाल्लं आहे. मात्र इंदिरा गांधींनी हरितक्रांती केली आणि आपण जगभरात चांगलं अन्नधान्य देऊ लागलो. 

हा पुरस्कार सीमावर्ती भागातील अशा लोकांशी महाराष्ट्राचे नाते जोडण्यासाठी काम करणाऱ्या प्रतिष्ठित पंजाबी व्यक्तींना दिला जातो. तेराव्या शतकातील संत-कवी नामदेव यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो. संत नामदेवांना शिख धर्मात मानाचे स्थान आहे संत नामदेव यांनी 23 वर्षे पंजाबमध्ये राहून तेथील लोकांना भक्ती संप्रदायाची शिकवण दिली. नामदेवांनी पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे आपला देह ठेवला असे मानले जाते. कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय राष्ट्रीय कार्याबद्दल रुपये एक लाख एक हजार रोख आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दिला जातो.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Embed widget