Ajit Doval : अजित डोवाल सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, पीके मिश्रा पंतप्रधानांचे प्रधान सचिव कायम
Ajit Doval NSA : अजित डोवाल यांची 2014 साली पहिल्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा त्यांची पुन्हा एकदा त्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
![Ajit Doval : अजित डोवाल सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, पीके मिश्रा पंतप्रधानांचे प्रधान सचिव कायम Ajit Doval as National Security Adviser for third consecutive term PK Mishra as Principal Secretary to Prime Minister Narendra Mod Cabinet marathi Ajit Doval : अजित डोवाल सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, पीके मिश्रा पंतप्रधानांचे प्रधान सचिव कायम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/07840f5a6a14d619b342ff946904a7761718279548964958_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आता अजित डोवाल (Ajit Doval) यांचीही सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी (NSA) नियुक्ती करण्यात आली आहे. तर पीके मिश्रा हेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिवपदी कायम राहतील. अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
पीके मिश्रा यांना त्यांच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाणार आहे. तर अमित खरे आणि तरुण कपूर पुढील आदेशापर्यंत पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून राहतील.
Ajit Doval appointed as National Security Advisor for a third time, appointment co-terminus with PM Modi pic.twitter.com/TTLRotwQbB
— ANI (@ANI) June 13, 2024
डॉ. पीके मिश्रा आणि अजित डोवाल हे दोघेही पंतप्रधानांचे सर्वाधिक काळ प्रमुख सल्लागार राहिले आहेत. अजित डोवाल हे 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते दहशतवादविरोधी आणि आण्विक विषयांमध्ये तज्ञ आहेत.
डॉ. पीके मिश्रा हे 1972 च्या बॅचचे निवृत्त अधिकारी आहेत. ते भारत सरकारच्या कृषी सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर मागील दोन टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. डॉ. मिश्रा आणि NSA अजित डोवाल हे दोघेही पंतप्रधान मोदींच्या सर्वात विश्वासू लोकांपैकी मानले जातात. कारण ते दोघेही 2014 मध्ये पंतप्रधान होण्याआधीपासून त्यांच्याशी संबंधित आहेत.
अजित डोवाल यांनी पंजाबमध्ये आयबीचे ऑपरेशनल चीफ आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून काम केले आहे. त्यामुळे या दोन्ही संवेदनशील भागात पाकिस्तानच्या कारस्थानाचा त्यांना थेट अनुभव आहे.
STORY | Spymaster Ajit Doval reappointed NSA, P K Mishra to continue as principal secretary to PM
— Press Trust of India (@PTI_News) June 13, 2024
READ: https://t.co/n1Vl9SrI4s pic.twitter.com/jGdW3PBxq5
अजित डोवाल हे या विषयात एक्सपर्ट
अजित डोवाल यांनी पंजाबमध्ये आयबीचे ऑपरेशनल चीफ आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून काम केले आहे. यामुळे दोन्ही संवेदनशील भागात पाकिस्तानचे कारस्थान समजून घेण्याचा त्यांना अनुभव आहे. अजित डोवाल यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मध्यपूर्वेतील परिस्थिती आणि तिथल्या देशांशी असलेल्या संबंधांबाबत बराच अनुभव आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील त्यांची पहिली मोठी जबाबदारी म्हणून अजित डोवाल हे गुरुवारी (13 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत इटलीतील G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)