एक्स्प्लोर

Amol Mitkari : रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचंय, पण जयंत पाटील त्यांचा टप्प्यात कार्यक्रम करणार : अमोल मिटकरी

Amol Mitkari : आधी अजितदादा पक्षात असताना त्यांना त्रास द्यायचा कार्यक्रम केला, आता जयंत पाटील अडसर ठरतात हे समजल्यावर त्यांना बाजूला करण्याचं कारस्थान रोहित पवार करत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. 

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील जयंत पाटील विरूद्ध रोहित पवार (Jayant Patil Vs Rohit Pawar) असा वाद असून रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने ते जयंत पाटलांना बाजूला सारण्याचं काम करत असल्याचा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला. राष्ट्रवादीच्या उभारणीत जयंत पाटील यांचा मोठा हात असून ते रोहित पवारांचा टप्प्यात घेऊन कार्यक्रम करणार असल्याचंही मिटकरी म्हणाले. 

रोहित पवार हे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे आहेत, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने आधी अजितदादा आणि आता जयंत पाटलांना बाजूला सारण्याचं काम करत असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली. 

रोहित पवारांवर टीका करताना अमोल मिटकरी म्हणाले की, जयंत पाटलांचे राष्ट्रवादी उभारण्यामागे वाटा आहे. हा नव्याने आलेला नवखा युवक पहिल्यांदा आमदार झाला. लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार आणि जयंत पाटलांचं मोठं योगदान आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे पिलर आहेत. रोहित पवारांनी ट्विटरवर टिवटिव करण्यापेक्षा पवारांना सांगावं. 

जयंत पाटील टप्प्यात कार्यक्रम करणार

रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून हे सर्व सुरू असल्याचा आरोप करत अमोल मिटकरी म्हणाले की, अजितदादा असतानाही असाच प्रयत्न सुरू होता. अजितदादांनी पवारसाहेबांकडे वेगळं काही मागितलं नव्हतं, पक्षाची जबाबदारी मागितली होती. रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची होती. जयंत पाटील आता त्यामध्ये अडसर ठरत असल्याने त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. रोहित पवारांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. म्हणून आता जयंत पाटलांचा अपमान करायचा आहे. पण जयंत पाटील याचा टप्प्यात कार्यक्रम वाजवणार. 

रोहित पवारांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे. अहिल्यानगरच्या मेळाव्यात त्यांनी जयंत पाटलांच्या विरोधात वक्तव्य केलं. रोहित पवार आता वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना आता काही कामधंदा राहिला नाही. विधानसभा तोंडावर आली असल्याने बालिश चाळे सुरू आहेत. उगाच हिरोगिरी करायची आणि हिरो व्हायचं काम सुरू आहे. 

भुजबळ नाराज नाहीत

सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवल्यानंतर छगन भुजबळ नाराज नसल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. ते म्हणाले की, हा निर्णय सर्वानुमते झाला असून भुजबळांचीही त्याला मान्यता मिळाली. भुजबळ नाराज असते तर त्यांनी सांगितलं असतं. 

ही बातमी वाचा: 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
Embed widget