एक्स्प्लोर
लॉकडाऊनमध्ये 'एअरटेल थँक्स' अॅपमुळे रिचा्र्ज करणं बनलं सोपं, वापरा 'या' चार सोप्या पद्धती
अॅपवर टी. व्ही., विंक म्युझिक, यूपीआय पेमेंट आणि अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप या सारख्या सेवा देखील उपलब्ध आहेत.

Young Indian woman sitting in comfortable lounge chair, looking at her mobile phone with a smile. Jodhpur, Rajasthan, India.
मुंबई : लॉकडाऊनमुळे 50 दिवसांपासून लोकांना मोबाईल रिचार्ज करणे यासारख्या तसेच अनेक महत्वाच्या गोष्टींशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु भारतातील सर्वात प्रसिद्ध मोबाइल नेटवर्क एअरटेलने या संकटाच्या काळातही आपल्या ग्राहकांची संपूर्ण काळजी घेतली आहे. एअरटेलच्या थँक्स अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करणे अधिक सोपे झाले आहे. फक्त रिचार्जच नाही तर या अॅपवर टी. व्ही., विंक म्युझिक, यूपीआय पेमेंट आणि अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप या सारख्या सेवा देखील उपलब्ध आहेत. तसेच एअरटेलच्या www.airtel.in/airtel-thanks-app या वेबसाईटवर थँक्स अॅपविषयी अधिक माहिती मिळेल.
रिचार्ज करण्याच्या चार सोप्या पद्धती
- प्ले स्टोअर वरुन थँक्स अॅप डाऊनलोड करा.
- त्यानंतर रिचार्जचा पर्याय निवडा.
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर रिचार्जची रक्कम टाका.
- ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडल्यानंतर काही क्षणात रिचार्ज होईल.
आणखी वाचा























