बोर्डिंग पाससाठी विमान कंपन्यांकडून अतिरिक्त शुल्क, हवाई वाहतूक मंत्र्यांनी म्हटले...
Charge For Boarding Pass: काही विमान कंपन्यांनी वेब-चेक इन करण्याऐवजी बोर्डिंग पासला प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क वसुली करण्यास सुरुवात केली आहे.
Charge For Boarding Pass: बोर्डिंग पाससाठी विमान कंपन्यांनी अतिरिक्त शुल्क घेण्यास सुरुवात केल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्वीटर तक्रार करणाऱ्या प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेतली आहे. विमान कंपन्यांकडून बोर्डिंग पाससाठी अतिरिक्त शुल्क वसुली केली जात असल्याची तक्रार या प्रवाशाने केली होती. त्यानंतर ज्योतिरादित्य यांनी तुमच्याशी सहमत असून या नियमाबद्दल चौकशी करू असे म्हटले आहे.
काही विमान कंपनीकडून अतिरिक्त शुल्क वसूल केले जात आहे. स्पाइस जेटविरोधात सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर विमान कंपन्यांना धारेवर धरले आहे. वेब चेक-इनला प्राधान्य न देता बोर्डिंग पासला प्राधान्य देत आहेत. विमानतळावरील काउंटरवरून बोर्डिंग पास घेणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क वसूली केली जात आहे.
Agreed, will examine this asap! https://t.co/KkY8b0xP93
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) May 13, 2022
विमानतळावर बोर्डिंग पास काढताना दर तिकिटामागे 200 रुपये प्रवाशांकडून घेतले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. स्पाइसजेट, इंडिगो आदी विमान कंपन्यांकडून शुल्क घेतले जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
Ridiculous .Is @JM_Scindia listening? https://t.co/HBL8hUo4oT
— Madhavan Narayanan (@madversity) May 13, 2022
काही प्रवाशांनी विमान कंपन्यांचा हा नवीन नियम चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
Charging for issuing a boarding pass that an airline is obligated to issue over and above the ticket price is totally against the public interest!@flyspicejet @AjaySingh_SG @nch1915 @PMOIndia
— Dr. Neeti Shikha (@neetishikha) May 13, 2022
तर, ट्वीटरवरील काही युजर्सकडून विमान कंपन्यांची बाजू घेतली आहे. वेब चेक-इनची सुविधा असताना तुम्हाला बोर्डिंग पासची गरजच काय, असा सवालही काही युजर्सने उपस्थित केला.
But why do u need a boarding card?? It’s on ur phone. Same rule abroad & worldwide. They r trying to dissuade ppl from using paper. In 2022 ppl still want to use paper😱
— BHAIRAVI GOSWAMI (@bhairavigoswami) May 13, 2022
दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्पेस जेट विमान चर्चेत आले होते. लँडिंग करताना विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. या दरम्यान काही प्रवाशांना दुखापत झाली होती. हे विमान पश्चिम बंगालमधील दुर्गापूर विमानतळावर उतरवण्यात आले. जवळपास 14 प्रवाशांना आणि तीन क्रू सदस्यांना दुखापत झाली होती. या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक खात्याने दिली आहे.