एक्स्प्लोर

Air India Plane Crash : गुजरातमध्ये Air India चं विमान कोसळलं; शरद पवार, फडणवीस, शिंदेंसह दिग्गजांकडून शोक व्यक्त

Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे.

Air India Plane Crash Ahmedabad : गुरुवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. एअर इंडियाचे प्रवासी विमान लंडनला जाण्यासाठी निघाले होते, ते टेकऑफदरम्यान कोसळले आहे. उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच हे विमान मेघानीनगरच्या रहिवासी परिसरात कोसळले. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 242 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह दिग्गज नेत्यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अहमदाबाद विमानतळावर एअर इंडिया प्रवासी विमान अपघाताची बातमी ऐकून खूप दुःख आणि धक्का बसला आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अहमदाबाद येथील भीषण विमान अपघात अतिशय धक्कादायक आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. गुजरात प्रशासन मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य करत असून विमानातील वाचलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले जात आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. या भयंकर दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे. 

खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे की, आज अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या परिस्थितीबद्दल ऐकून मन दुखावले. या चिंताग्रस्त क्षणी, आम्ही विमानातील प्रत्येक जण आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहोत. आम्ही गुजरातच्या नागरिकांसोबत एकजुटीने उभे आहोत. या आव्हानात्मक काळात आम्ही शक्तीसाठी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे. तर खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आज अहमदाबाद विमानतळावर झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या बातम्यांनी मन फारच चिंताग्रस्त झाले आहे. या चिंताजनक वेळेत आम्ही सर्व प्रवासी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा

Ahmedabad plane crash : गुजरातमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन; महत्वाची एक अट पूर्ण केल्यानंतर भाच्चीच्या लग्नासाठी सोडलं
अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन; महत्वाची एक अट पूर्ण केल्यानंतर भाच्चीच्या लग्नासाठी सोडलं
ठाणे महापालिका आवारात 'दिवसाच खेळ चाले'; कारमध्ये दारू अन् चकना, पोलीस येताच धावाधाव, एकास पकडले
ठाणे महापालिका आवारात 'दिवसाच खेळ चाले'; कारमध्ये दारू अन् चकना, पोलीस येताच धावाधाव, एकास पकडले
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!

व्हिडीओ

Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस
Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन; महत्वाची एक अट पूर्ण केल्यानंतर भाच्चीच्या लग्नासाठी सोडलं
अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन; महत्वाची एक अट पूर्ण केल्यानंतर भाच्चीच्या लग्नासाठी सोडलं
ठाणे महापालिका आवारात 'दिवसाच खेळ चाले'; कारमध्ये दारू अन् चकना, पोलीस येताच धावाधाव, एकास पकडले
ठाणे महापालिका आवारात 'दिवसाच खेळ चाले'; कारमध्ये दारू अन् चकना, पोलीस येताच धावाधाव, एकास पकडले
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
नांदेडमधील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, म्हणाले...
नांदेडमधील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, म्हणाले...
Embed widget