एक्स्प्लोर
हार्दिकची कथित सीडी समोर आणणारी व्यक्ती भाजपच्या जवळची?
विशेष म्हणजे, 5 नोव्हेंबरला एबीपी न्यूजशी बोलतानाच हार्दिक पटेलने शंका व्यक्त केली होती की, येत्या काही दिवसात अशाप्रकारची सीडी समोर आणली जाऊ शकते.
अहमदाबाद : गुजरातचं राजकारण सध्या पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलच्या कथित सीडीभोवती फिरत आहे. या प्रकरणात आता आणखी माहिती समोर आली आहे. हार्दिकची कथित सीडी समोर आणणारी व्यक्ती भाजपच्या जवळची असल्याचे म्हटले जात आहे.
हार्दिकची ज्याने सीडी समोर आणली, त्या अश्विन सांकडसरिया या व्यक्तीचा भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे कथित सीडीचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
अश्विन सांकडसरिया यांनी एक सीडी समोर आणलीय. या व्हिडीओतील व्यक्ती ही हार्दिक पटेल असून, त्याच्यासोबत एक महिलाही आहे, असा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे. या कथित सीडी प्रकरणामुळे गुजरातचं राजकारण आणखीच पेटलं आहे.
सीडी समोर आल्यानंतर हार्दिक पटेलने या सर्व प्रकारामागे कट असल्याचे म्हटले आहे. शिवाय, गुजरातमधील महिलांचा अपमान असल्याचे सांगत भाजपवर निशाणाही साधला आहे.
विशेष म्हणजे, 5 नोव्हेंबरला एबीपी न्यूजशी बोलतानाच हार्दिक पटेलने शंका व्यक्त केली होती की, येत्या काही दिवसात अशाप्रकारची सीडी समोर आणली जाऊ शकते.
आता ज्याने कथित सीडी समोर आणली, त्या अश्विन सांकडसरियाचा फोटो केंद्रीय मंत्र्यासोबत असल्याने संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
याबाबत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना विचारले असता, त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
मेहसाणाच्या सभेत राहुल गांधींनीही भाजपवर टीका केली. ते म्हणाले, "पराभवाच्या भीतीने भाजप आता घाणेरडं राजकारण करु लागलं आहे."
गुजरात विधानसभेच्या मतदानाला अगदी काही दिवस बाकी आहेत. याचवेळी हार्दिकची कथित सीडी समोर आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement