एक्स्प्लोर

Ahmedabad Plane Crash: 1:10 वाजता बोर्डिंग, 1:17 वाजता टेकऑफ, काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान कोसळले, अपघाताची टाइमलाइन आली समोर

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या विमानाच्या टेकऑफनंतर काही वेळातच हे विमान कोसळलं आणि भीषण दुर्घटना झाली आहे.

Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले यामध्ये अनेक जण दगावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विमानाच्या अपघातानंतर विमानाने पेट घेतला. परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. 

अपघाताची संपूर्ण वेळ

दुपारी 1.10 - बोर्डिंग पूर्ण, टेकऑफची तयारी
एअर इंडियाचे विमान एआय-171 अहमदाबादहून लंडनला जाणार होते. सर्व 242 प्रवासी विमानात होते आणि विमान धावपट्टीवर टेकऑफसाठी तयार होते.

दुपारी 1.17 – टेकऑफ
विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले. सुरुवातीचे काही मिनिटे उड्डाण सामान्य होते.

विमानात एकूण 242 लोक होते

विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 230 प्रौढ, 2 मुले आणि 12 क्रू मेंबर्स (10 केबिन क्रू आणि 2 पायलट) होते. अपघाताच्या वेळी विमान पायलट-इन-कमांड सुमित सभरवाल आणि सह-पायलट क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होते. अपघातानंतर विमानतळावरील आपत्कालीन पथकाने बचावकार्य सुरू केले आहे. घटनास्थळापासून दूरवर धुराचे लोट दिसत आहेत. मेघानीनगरमधील अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

डीजीसीए, डीएडब्ल्यू, एडीएडब्ल्यू आणि एफओआयचे वरिष्ठ अधिकारी आधीच अहमदाबादमध्ये उपस्थित होते. ते या अपघाताशी संबंधित सर्व माहिती गोळा करत आहेत आणि तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या मते, गांधीनगरहून एनडीआरएफ तीन पथके विमान अपघातस्थळी पाठवण्यात आली आहेत, ज्यामध्ये 90 कर्मचारी आहेत. वडोदराहून आणखी तीन पथके पाठवण्यात येत आहेत.

अमित शाह यांनी अपघाताची घेतली माहिती

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी या दुर्घटनेबाबत चर्चा केली आहे. त्यांच्याकडून एअर इंडिया विमान अपघाताची माहिती घेतली आहे. केंद्र सरकारने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री देखील विमानात

 गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी देखील हे देखील विमानात होते. विजय रूपाणी लंडनला जात होते. ते त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांच्या पत्नी आणि मुलीसह त्यांचे अनेक नातेवाईक लंडनमध्ये राहतात, ज्यांना ते भेटणार होते.

नेमकं काय घडलं?

आज(गुरूवारी, ता, 12) रोजी अहमदाबाद येथे मेसर्स एअर इंडियाच्या बी787 विमान व्हीटी-एएनबीला अपघात झाला. आज अपघात झाला त्यावेळी मेसर्स एअर इंडियाचे बी787 विमान व्हीटी-एएनबी अहमदाबादहून AI-171 उड्डाण करत असताना (अहमदाबाद ते गॅटविक) उड्डाण केल्यानंतर लगेचच क्रॅश झाले. विमानात 242 लोक होते ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली उड्डाण करत होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसीचे 8200 तासांचा अनुभव असलेले विमानचालक आहेत. सह-वैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.

एटीसीनुसार, विमान अहमदाबादहून 1.39 भारतीय वेळेनुसार (0809 यूटीसी) धावपट्टी 23 वरून निघाले. त्यांनी एटीसीला मेडे कॉल दिला, परंतु त्यानंतर एटीसीने केलेल्या कॉलला विमानाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. रनवे 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. अपघातस्थळावरून प्रचंड काळा धूर येत असल्याचे दिसून आले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter List Row: 'वोट चोरी'च्या आरोपांवरून Thackeray-BJP आमनेसामने, Ashish Shelar गौप्यस्फोट करणार?
Phaltan Doctor Case: 'तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय?', SIT वरून मेहबूब शेख यांचा 'देवाभाऊं'ना थेट सवाल
Mahayuti Tussle: 'असले सूत्र कधी ऐकले नाही', Bharat Gogawale यांच्या नव्या फॉर्म्युल्याची Sunil Tatkare यांनी उडवली खिल्ली!
Maharashtra Politics: 'थोरवेंचा टप्प्यात कार्यक्रम करणार', Karjat मध्ये दादांच्या NCP ची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी!
Maharashtra : श्रीरामपुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण, 40 वर्षांनी स्वप्नपूर्ती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget