एक्स्प्लोर

अहमदाबादच्या 12वी पास मुलानं घातला 25 हजार परदेशी नागरिकांना गंडा! पोलिसही चक्रावले

अहमदाबाद : अहमदाबाद क्राईम ब्रांचने (Crime Branch) एका अल्पवयीन सायबर गुन्हेगाराला (Cyber Crime) अटक केली आहे. या 12वी पास मुलाने आतापर्यंत 25,000 परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचं समोर झालं आहे.

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील क्राईम ब्रांचने एका अल्पवयीन सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे. या 12वी पास मुलाने आतापर्यंत 25,000 परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचं समोर झालं आहे. परदेशी नागरिकांची फसवणूक करुन त्याने आतापर्यंत सुमारे 50 कोटी रुपये मिळवले आहेत. या सायबर गुन्ह्यामध्ये त्याने कराचीमधील एका माणसाची मदत घेतली. त्याने आतापर्यंत सुमारे 40 देशांमधूल नागरिकांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, 21 वर्षीय तरुण हा नारायण नगरमध्ये राहणाऱ्या एका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराचा मुलगा असून त्याची आई महापालिकेच्या रुग्णालयात काम करते. आलिशान जीवनशैलीसाठी आणि सहज पैसे कमवण्यासाठी नारायणने 'डार्क वेब'चा वापर केला. त्याने इतरांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून 5 कोटी रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या आणि नंतर त्या रोख किंमतीला विकल्या.
  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणची ओळख कराचीमधील जिया मुस्तफा या व्यक्तीशी झाली. या व्यक्तीने नारायणला सायबर क्राईमचे धडे दिले. मुस्तफाने त्याला स्कॅमरच्या जीवनातील युक्त्या शिकवल्या आणि रशियन हॅकर्सकडे जाण्याचा सल्ला दिला. हे रशियन हॅकर्स वेबसाइट चालवतात जेथे जवळपास 50 देशांतील लोकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड तपशील विकले जातात. परमार यांने रशियन हॅकर्सकडून परदेशातील लोकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्डचे तपशील विकत घेतले आणि अमेरिकेपासून ते युगांडा पर्यंतच्या देशांतील लोकांची खाती रिकामी करण्यास सुरुवात केली.

नारायणला शिक्षणाची आवड नव्हती. त्यामुळे त्याने शिक्षण सोडले आणि सोशल मीडियावर सक्रिय झाला. त्यानंतर त्याला सर्फिंगद्वारे सायबर क्राईमची माहिती मिळाली. त्याचा सोशल मीडियावर सायबर गुन्हे करणारे आणि माहिती पुरवणाऱ्या लोकांशी ऑनलाईन ओळख झाली. त्यांनंतर त्याने परदेशातील लोकांची बँक खाती रिकामी करण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये, परमारला ‘डार्क सिक्रेट्स’ नावाच्या सोशल मीडिया ग्रुपशी संबंध आला. याग्रुपवर सक्रिय बँक खात्याचे तपशील मोठ्या प्रमाणात विकले जायचे. परमारने काही डीलमध्येही हात आजमावला आणि पहिल्या डीलमध्ये सुमारे 2,000 रुपये कमावले. 

पोलिसांच्या प्राथमिकस तपासात समोर आले की, नारायण अर्ध्या मिनिटापेक्षा कमी वेळात एखाद्याचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड मिळवून काही मौल्यवान वस्तू किंवा दागिने खरेदी करतो, त्यानंतर तो रोखीने विकतो. त्याने सुमारे वर्षभरात 50 कोटी रुपयांच्या वस्तूंची खरेदी-विक्री केली. आश्रम रोडवरील एका दुकानात 30 रेफ्रिजरेटरची ऑर्डर दिल्यानंतर पोलिसांनी त्याला आणि इतर दोघांना पकडले तेव्हा या रॅकेटचा पर्दाफाश झाला. 
त्याला अटक करून नंतर पुराव्यांअभावी जामिनावर सोडण्यात आले. त्याच्या सुटकेनंतरही, त्याने डार्क वेबवरून खरेदी करणे सुरु ठेवले आहे. डार्क वेब असे जाळे आह  ज्याचा आयपी पत्ता (IP Address) शोधला जाऊ शकत नाही.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की  ते त्याच्याविरुद्ध कारवाई करु शकत नाहीत कारण त्याने त्याच्या रॅकेटचा डिजिटल पुरावेच नष्ट केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की तो आता सुमारे 10 तरुणांना सायबर गुन्ह्याचे धडे देत आहे. नारायण या तरुणांना सायबर फसवणूक करण्यात मार्गदर्शन करत आहे. तो आता रशियन हॅकर्सकडून डेबिट किंवा क्रेडिट कार्डबाबत माहिती विकत घेऊन इतर 10 तरुणांसह मिळून जगभरातील श्रीमंत लोकांची फसवणूक करत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget