Sugar Production : यूपीमध्ये ऊसाची 'ही' जात प्रभावी, उत्पादनात मोठी वाढ; शेतकऱ्यांना फायदा
Sugar Production : उत्तर प्रदेशमध्ये ऊसाची एक जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्या जातीच्या ऊसामुळं उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
![Sugar Production : यूपीमध्ये ऊसाची 'ही' जात प्रभावी, उत्पादनात मोठी वाढ; शेतकऱ्यांना फायदा Agriculture News Sugarcane variety co 0238 help up farmers to get bumper production despite of red rot disease Sugar Production : यूपीमध्ये ऊसाची 'ही' जात प्रभावी, उत्पादनात मोठी वाढ; शेतकऱ्यांना फायदा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/c6e8242ccd3f772c9b792fd56f708f7f1674091919249339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sugar Production : ऊस उत्पादनात महाराष्ट्र (Maharashtra) आणि उत्तर प्रदेश (UP) ही दोन राज्य आघाडीवर आहेत. या दोन्ही राज्यात साखर उत्पादनात (Sugar Production) स्पर्धा असल्याचे पाहायला मिळते. उत्तर प्रदेशमध्ये CO-0238 ही ऊसाची जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. ऊसाच्या या जातीमुळे उत्तर प्रदेशात 2016-17 मध्ये ऊसाची उत्पादकता 1.5 टक्क्यांनी वाढली आहे. तर साखरेच्या रिकव्हरीत देखील 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2019 मध्ये संपूर्ण देशात साखरेच्या उत्पादनात 2 टक्क्यांची घट झाली होती, तेव्हा यूपीने 126.38 लाख टनाचे विक्रमी साखरेचं उत्पादन घेतलं होतं.
मागील वर्षी हवामानाच्या बदलाचा शेती पिकांना मोठा फटका बसला होता. शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. उत्तर प्रदेशातील काही भाग दुष्काळाने हैराण झाला होता. तर कुठे पुराचे पाणी ओसरण्यास अनेक दिवस लागले होते. याचा वाईट परिणाम शेती पिकावर झाला आहे. या घटनांमुळे ऊस उत्पादनात घट झाल्याचा अंदाज बांधला जात होता. परंतु ऊस उत्पादनात यूपीला अव्वल ठेवण्यासाठी CO-0238 या ऊसाच्या जातीचा वाटा आहे. किडींचा प्रादुर्भाव आणि हवामानाची अनिश्चितता असतानाही ऊसाच्या उत्पादनात तिथे फारशी घट झाली नाही. अलीकडेच पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री संजीव बल्यान यांनी देखील या ऊसाच्या जातीचा विशेष उल्लेख केला होता.
महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन वाढले
उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचं उत्पादन घेतलं जातं. ऊसाच्या उत्पादनात यूपी नेहमी आघाडीवर असणारे राज्य आहे. पण आता साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अहवालानुसार, चालू ऊस हंगामात (ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023) 15 जानेवारीपर्यंत 156.8 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 150.8 लाख टन होते.
या राज्यांमध्येही साखरेचे उत्पादन वाढलं
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अहवालानुसार, 2021-22 या वर्षात महाराष्ट्राने 137.2 लाख टन साखरेचे उत्पादन घेतलं. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य बनले आहे. तर उत्तर प्रदेश हे दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये तिसर्या क्रमांकावर कर्नाटक आहे. जिथे गेल्या वर्षी 33.6 लाख टन साखरेचे उत्पादन केले. या यादीत तामिळनाडू आणि गुजरातच्या नावांचाही समावेश आहे. तिथेही साखर उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. तामिळनाडूमध्ये साखरेचे उत्पादन 2.1 लाख टनांवरुन 3.6 लाख टन झाले आहे, तर गुजरातमध्ये 4.6 च्या तुलनेत 4.8 लाख टन उत्पादन झाले आहे.
साखर निर्यातीत मोठी वाढ
कृषी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार साखर निर्यातीत विक्रमी वाढ झाली आहे. 2017-18 या वर्षात साखरेची निर्यात 6.8 लाख मेट्रिक टन इतकी मर्यादित होती. परंतु 2021-22 या वर्षात त्यात विक्रमी वाढ झाली आहे. या कालावधीत देशातून 110 लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली आहे. साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी 55 लाख टन साखरेचा करार केला असून, त्यापैकी 18 लाख टन आधीच निर्यात झाली आहे. गेल्या हंगामातही 112 लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
Sugar Export : केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी, मात्र, 'या' देशांमध्ये निर्यातीसाठी सूट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)