kharif crop : खरीप पिकांच्या लागवडीत वाढ, कृषी मंत्रालयानं दिली माहिती; भात लागवडीत मोठी वाढ होऊनही निर्यातबंदी
kharif crop : देशात चालू खरीप हंगामात पिकांच्या (kharif crop) लागवडीत वाढ झाली आहे. याबाबतची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
kharif crop : देशात चालू खरीप हंगामात पिकांच्या (kharif crop) लागवडीत वाढ झाली आहे. याबाबतची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात 979.88 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. मागील तुलनेत लावडीत वाढ झाली आहे. मागील वर्षी या काळात 972.58 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यावर्षी भात लागवडीत मोठी वाढ झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे.
भाताच्या लागवडीत वाढ, तरीही तांदूळ निर्यातीवर बंदी
कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तांदळाच्या लागवडीत चांगली वाढ झाली आहे. आत्तापर्यंत 328.22 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. ती मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. मागील वर्षी या काळात 312 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी त्यामध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली असतानाही केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. लागवड वाढली असतानाही तांदळाच्या निर्यातीवर बंदी का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळे, दुष्काळ यामुळं तांदूळ उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळं देसात तांदळाचा पुरवठा कमी पडू नये म्हणून तांदूळ निर्यावर बंदी घालण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, तांदळाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही निर्यातबंदी केल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे.
डाळींसह तेलबियांच्या पेरणीत घट
कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी डाळींच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. यावर्षी आत्तापर्यंत 113.07 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची पेरणी झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. या काळात मागील वर्षी 122.77 हेक्टर क्षेत्रावर डाळींची पेरणी झाली होती. त्यामध्ये यावर्षी घट झाली आहे. त्याचबरोबर भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ अशा तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात देखील किरकोळ घट झाली आहे. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत तेलबियांची 183.33 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. जी मागीव वर्षी या काळात 184.61 लाख हेक्टरवर होती. दरम्यान, ऊस लागवडीच्या क्षेत्रात किरकोळ वाढ झाली आहे. उत्पादक शेतकऱ्यांनी आतापर्यंत 56.06 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. जी मागील वर्षी 55.20 लाख हेक्टर होती.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पेरलेल्या पीक ही जानेवारी ते मार्च या कालावधीत परिपक्व होतात. या काळातच पिकांची कापणी केली जाते. तर जून-जुलैमध्ये पेरणी केलेली आणि मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेली पिके ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढली जातात. रब्बी आणि खरीप दरम्यान उत्पादित होणारी पिके ही उन्हाळी पिके आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: