Aspergillosis Fungus: कोरोनातून बरे झालेल्यांना म्युकरमायकोसिसनंतर आता अॅस्परजिलोसिसचा धोका, काय आहेत लक्षणे?
अॅस्परजिलोसिस एक बुरशीजन्य संसर्ग आहे. ही बुरशी आपल्या सभोवतालच्या वातावरणातच असते, परंतु ज्यांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत आहे अशांना ही नुकसान करत नाही. मात्र ज्याची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्याल याची लागण होते.
मुंबई : कोरोनाच्या (Coronavirus) दुसर्या लाटेच्या उद्रेकानंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. मात्र म्युकरमायकोसिसचं (काळी बुरशी) संकट कायम आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये एकीकडे वाढ होत असतना नवं संकट आता उभं ठाकलं आहे. काळ्या बुरशीनंतर आता कोरोनाच्या रूग्णांमध्ये इतर बुरशीजन्य संक्रमण दिसू लागले आहे. रुग्णांना विविध प्रकारच्या संसर्गांचा सामना करावा लागत आहे. आता आणखी एक बुरशीचा प्रकार समोर आला आहे, ज्याला अॅस्परजिलोसिस (Aspergillosis) म्हणतात. गुजरातमध्ये याचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतरही हा संसर्ग होत आहे. अॅस्परजिलोसिस संसर्गाची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊया.
काय आहे अॅस्परजिलोसिस?
अॅस्परजिलोसिस एक बुरशीजन्य संसर्ग आहे. ही बुरशी आपल्या सभोवतालच्या वातावरणातच असते, परंतु ज्यांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत आहे अशांना ही नुकसान करत नाही. मात्र ज्याची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांच्या श्वासोच्छवासाद्वारे किंवा फुफ्फुसात संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासामुळे शरीरात जाऊन या बुरशीने अॅलर्जी होते. अॅस्परजिलोसिसची तीव्रता यावरुन समजून येते की ही रक्तवाहिन्या आणि त्याही पलीकडे पसरते. या अॅस्परजिलोसिसचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो.
अॅस्परजिलोसिस संसर्गाची लक्षणे
श्वास घ्यायला त्रास- जर तुम्हाला श्वास घेण्यात त्रास होत असेल तर ही संसर्ग झाल्याची लक्षणे असू शकतात. फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यानंतर या बुरशीमुळे ऊतींचे नुकसान होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते. त्यामुळे हे स्पष्ट होते की संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचला आहे.
ताप आणि थंडी - कोरोनाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे ताप आणि सर्दी. अशा परिस्थितीत आपण कोरोना संसर्गापासून पूर्णपणे बरे झाले असल्यास, यानंतरही आपल्याला ताप आला असेल तर ते या बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण असू शकते.
खोकल्यामध्ये रक्तस्त्राव- जर हा संसर्ग आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचला असेल तर खोकला येणे सुरूच राहील. काहींना खोकल्यासह रक्तही येऊ शकतं.
डोके आणि डोळ्यांमध्ये वेदना- बुरशीचे नाकावाटे शरीरात प्रवेश करते. ही बुरशी मुख्यत: सायनस, फुफ्फुसात संक्रमण करते. मग ही बुरशी मेंदूच्या दिशेने वाटचाल सुरू करते. ज्यामुळे डोके आणि डोळ्यांत वेदना होते.
थकवा आणि अशक्तपणा- कोरोनानंतर बर्याचदा अशक्तपणा आणि थकवा राहतो. असं असलं तरी कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास थकवा आणि अशक्तपणा आणखी वाढतो. त्यामुळे रोजची कामे करणेही अवघड होते.
स्कीन इन्फेक्शन- अनेक प्रकरणांमध्ये हा बुरशीजन्य संसर्ग त्वचेवर देखील परिणाम करतो. यामुळे त्वचेची जळजळ, लालसरपणा, सूज आणि मुरुम होऊ शकतात. संपूर्ण त्वचेवर खाज देखील सुटू शकते.
अॅस्परजिलोसिसचे निदान- अॅस्परजिलोसिसचे निदान थोडेसे अवघड आहे. परंतु बायोप्सी, रक्त चाचणी, छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन आणि फुफ्फुस स्कॅन केल्यावर डॉक्टर त्याचे निदान करतात.
अॅस्परजिलोसिसवर उपचार- कोणत्याही बुरशीजन्य संसर्गाबद्दल जितक्या लवकर त्याचे निदान होईल तितके चांगले. आरोग्य तज्ञांच्या मते, अॅस्परजिलोसिसवरील उपचार देखील काळ्या आणि पांढऱ्या बुरशीप्रमाणे केले जाते. शरीरात संक्रमण जास्त पसरल्यास शस्त्रक्रिया देखील करावी लागते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )