एक्स्प्लोर

गुरमीत राम रहीमनंतर 'ही' महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख?

तरीही गुरमीत राम रहीम जेलमध्ये गेल्यानंतर आता डेरा सच्चा सौदाची सत्ता कोणाकडे जाणार याची उत्सुकताही लागली आहे.

चंदीगड : साध्वीच्या लैंगिक शोषणप्रकरणी बाबा गुरमीत राम रहीमला पंचकुला सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलं आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर डेरा सच्चा सौदा प्रमुखाच्या समर्थकांनी पंजाब आणि हरियाणात धुडगूस घातला. पण ही बाब गृहित धरली जातच होती. पंरतु डेराची अब्जावधी रुपयांची संपत्ती आता कोणाच्या नावावर होणार याचीही चर्चा रंगली आहे. राम रहीमच्या अनुयायींनी घातलेल्या हैदोसामुळे नाराज झालेल्या पंजाब-हरियाणा हायकोर्टाने डेराची संपत्ती जप्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुनावला. पण तरीही गुरमीत राम रहीम जेलमध्ये गेल्यानंतर आता डेरा सच्चा सौदाची सत्ता कोणाकडे जाणार याची उत्सुकताही लागली आहे. 28 ऑगस्ट रोजी राम रहीमला शिक्षा सुनावली जाणार आहे. त्याला कमीत कमी 7 वर्षांची शिक्षा होईल, असं म्हटलं जात आहे. गुरमीतच डेराचा प्रमुख? गुरमीत राम रहीमच यापुढे डेरा सच्चा सौदाचं नेतृत्त्व करेल, अशीही चर्चा आहे. तो जेलमधूनच आपलं साम्राज्य चालवू शकतो. कारण वारसदाराबद्दल अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. गुरमीत राम रहीमनंतर 'ही' महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख? गुरमीतच्या मुलाचीही चर्चा, पण ते सोपं नाही गुरमीतनंतर डेरा सच्चा सौदाची धुरा त्याचा मुलगा जसमीत सिंह इंसा सांभाळेल, असं काही लोक बोलत आहेत. 2007 मध्ये सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर जसमीत इंसाला आपला वारसदार बनवण्याची घोषणा गुरमीतने केली होती. पण ते सहजसोपं नाही. यामागील मोठं कारण म्हणजे डेराचा एक नियम. नियमानुसार, डेराचा पुढील प्रमुख सध्याच्या प्रमुखाच्या कुटुंबतील नसावा. जसमीतशिवाय गुरमीतला चरणप्रीत इंसा आणि अमनप्रीत इंसा या दोन मुली आहे. शिवाय बाबाची हनीप्रीत नावाची आणखी एक मुलगी असून तिला दत्तक घेण्यात आलं होतं. फोटो : हरियाणात राम रहीमच्या भक्तांचा हैदोस मग कोण? जसमीत नाही तर मग डेराचं नेतृत्त्व कोण सांभाळणार हा प्रश्न कायम आहे. सध्या डेरा प्रमुख म्हणून सगळ्यांच्या नजरा 35 वर्षांच्या गुरु ब्रह्मचारी विपसनावर खिळल्या आहेत. विपसना डेरामधील दुसऱ्या स्थानावरची व्यक्ती आहे. ती एकमेव अशी व्यक्ती आहे, जिच्याकडे एखाद्या गोष्टीबाबत स्वत: निर्णय घेण्याचा अधिकार आहे. डेराद्वारे चालवला जाणाऱ्या गर्ल्स कॉलेजमधून विपसनाने पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. विपसनाच्या हाताखाली 250 लोकांची टीम काम करते, यामध्ये 150 महिला आहेत. डेरामार्फत चालवल्या जाणाऱ्या सामाजिक सेवा योजना ती सांभाळते. यात सैन्यसाठी रक्तदान शिबीर तसंच असहाय्य आणि गरीब भक्तांसाठीच्या योजनांचा समावेश आहे. आणखी एक नावही शर्यतीत विपसनाशिवाय डेरामध्ये आणखी एक नाव आहे जे सध्याचा डेरा प्रमुख गुरमीतचं निकटवर्तीय आणि विश्वासू मानलं जातं. 35 वर्षीय हनीप्रीत विपसनाला कडवं आव्हान देईल असं म्हटलं जात आहे. हनीप्रीतही विपसनाप्रमाणेच गुरु ब्रह्मचारी आहे. ती मागील सात वर्षांपासून डेरा प्रमुखासोबत असून त्याची विश्वासू समजली जाते. हनीप्रीतने गुरमीत राम रहीमच्या सर्व सिनेमात कामही केलं आहे. जर डेरा प्रमुख यांनी सकारात्मकता दाखवली तर हनीप्रीतही सत्ता सांभाळू शकते. गुरमीत राम रहीमनंतर 'ही' महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख? हनीप्रीत इंसा गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. त्यामुळे तिच्या नियुक्तीत डेरा प्रमुखाच्या निवडीचा नियम आड येणार नाही. शुक्रवारी गुरमीत जेलमध्ये जाताना हनीप्रीतही त्याच्यासोबत होती, शिवाय त्याचं सामान घेऊन सोबत चालत होती. त्यामुळे हनीप्रीतचं पारडं जड असल्याचं म्हटलं जात आहे. डेराचं भलंमोठं साम्राज्य हरियाणातील सिरसामध्ये डेरा सच्चा सौदाची जवळपास 700 एकर जमीन आहे. तीन रुग्णालय, एक इंटरनॅशनल आय बँक, गॅस स्टेशन आणि मार्केट कॉम्प्लेक्सशिवाय जगभरात सुमारे 250 आश्रमं आहेत. याशिवाय डेराची अनेक बँक खातीही आहेत जी अजून समोर आलेली नाहीत. डेरा प्रमुखाकडे लक्झरी गाड्यांचा भलामोठा ताफा आहे. 23 व्या वर्षी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख 1967 मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहीमला तत्कालीन डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी 23 सप्टेंबर 1990 मध्ये आपला वारसदार घोषित केलं. वयाच्या 23 व्या वर्षी बाबा राह रहीम डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनला. यानंतर बाबा राम रहीम यांच्या नेतृत्त्वात डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता वाढू लागली. बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदा सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि मानवसेवेपासून सर्वधर्मसमभावचा संदेश देतात. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. गुरमीत राम रहीमनंतर 'ही' महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख? काय आहे संपूर्ण प्रकरण? एप्रिल 2002 : 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर आहेत. साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. मे 2002 : तक्रारीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर तपासाची जबाबदारी सिरसा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोपवली होती. डिसेंबर 2002 : तक्रार योग्य असल्याचं सिद्ध झाल्यानंतर राम रहीमविरोधात कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर 2003 : ह्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास अधिकारी सतीश डागर यांनी चौकशी सुरु केली आणि 2005-2006 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या साध्वीला शोधून काढलं. जुलै 2007 : सीबीआयने प्रकरणाचा पूर्ण तपास करुन अंबाला सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. अंबालावरुन हे प्रकरण पंचकुला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर केलं. आरोपपत्रानुसार डेरामध्ये 1999 आणि 2001 मध्ये आणखी साध्वींचंही लैंगिक शोष झालं होतं. पण त्यांचा पत्ता लागला नाही. ऑगस्ट 2008 : प्रकरणाचा खटला सुरु झाला आणि डेरा प्रमुख राम रहीमविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. 2011 ते 2016 : प्रकरणाचा खटला चालला. डेरा प्रमुख राम रहीमकडून वकील सातत्याने बाजू लढवत राहिले. जुलै 2016 :  खटल्याच्या सुनावणीदरम्यान 52 साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यामध्ये 15 सरकारकडून आणि 37 बचाव पक्षाचे होते. जून 2017 : कोर्टाने डेरा प्रमुख बाबा राम रहीमच्या परदेश प्रवासावर बंदी घातली. 25 जुलै 2017 :  सीबीआय कोर्टाने या प्रकरणात दररोज सुनावणी करण्याचे निर्देश दिले, जेणेकडून लवकरच निकाल लावता येईल. 17 ऑगस्त 2017 : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आणि निकालासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली. 25 ऑगस्ट 2017 : बलात्कार प्रकरणी बाबा राम रहीम दोषी असल्याचा निकाल पंचकुला सीबीआय कोर्टाने दिला संबंधित बातम्या बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात? कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gaurav Ahuja Pune Crime : माज उतरला! पुणेकरांची हात जोडून माफी; गौरव अहुजा ‘माझा’वरSpecial Report | Aurangzeb Kabar | औरंगजेबाची कबर आणि राजकारण; विराधक- सत्ताधाऱ्यांचे वार-पलटवारABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10PM 08 March 2025Special Report Vaibhavi Deshmukh | वैभवीचा काळीज पिळवटणारा जबाब; 5 गोपनीय साक्षीदारांचा जबाब, कट उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
मोठी बातमी : खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
Jonty Rhodes Catch Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
International Women's Day 2025 : केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
Embed widget