कोरोनापाठोपाठ भारतात आफ्रिकी स्वाईन फ्लूचा शिरकाव; आसाममध्ये 2500 डुक्करांचा मृत्यू
भारतात कोरोना पाठोपाठ आता आफ्रिकी स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे. आसाममार्गाने आफ्रिकी स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला आहे.
गुवाहाटी : देशात कोरोनाचा कहर सुरू असून देशातील कोरोना बाधितांचा आकडा 40 हजारांच्या पार पोहोचला आहे. संपूर्ण देश कोरोनाशी लढत असतानाचा आता देशावर आणखी एक नवं संकट आलं आहे. देशात पहिल्यांदाच आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. आधीच कोरोनाचं सावटं आणि आता आफ्रिकी स्वाईन फ्लू अशा दोन गंभीर आजारांचा भारतात शिरकाव झाला आहे. आसाममार्गाने आफ्रिकी स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला आहे.
आसाम सराकारने रविवारी सांगितले की, राज्यात आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. यामुळे 306 गावांमधील 2500 हून अधिक डुक्करांचा मृत्यू झाला आहे. आसामधील पशुपालन आणि पशु चिकित्सक मंत्री अतुल बोरा यांनी सांगितलं की, केंद्र सरकारने डुक्करांना मारण्याची मंजुरी दिल्यानंतरही राज्य सरकार त्यांना मारण्याऐवजी आफ्रिकी स्वाईन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग शोधणार आहे.
आफ्रिकी स्वाईन फ्लूचा कोविड-19शी संबंध नाही
आसामधील पशुपालन आणि पशु चिकित्सक मंत्री अतुल बोरा यांनी बोलताना सांगितलं की, आफ्रिकी स्वाईन फ्लूचा कोरोना व्हायरसशी काहीही संबंध नाही. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्था (एनआयएचएसएडी) भोपाळने हा आफ्रिकी स्वाईन फ्लू (एएसएफ) असल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने आम्हाला सांगितलं आहे की, देशात या आजाराने पहिल्यांदाच शिरकाव केला आहे.'
30 लाख एकूण डुक्करांची संख्या
आसामधील पशुपालन आणि पशु चिकित्सक मंत्री अतुल बोरा यांनी डुक्करांच्या संख्येबाबत बोलताना सांगितले की, आसाममध्ये 2019मध्ये करण्यात आलेल्या गणनेनुसार, डुक्करांची संख्या जवळपास 21 लाख होती. परंतु, आतापर्यंत ही वाढून जवळपास 30 लाखांवर पोहोचली आहे.
संबंधित बातम्या :
Hantavirus in China | कोरोनानंतर आता चीनमध्ये हंता व्हायरस; एकाचा मृत्यू
Lockdown 3 |आजपासून लॉकडाऊन 3.0; काय सुरु होणार? काय बंद राहणार
लक्षणं न आढळणारे कोरोना रुग्णही ओळखणार, स्वित्झर्लंडच्या अँटीबॉडी चाचणीला अमेरिकेची मंजुरी