एक्स्प्लोर
Hantavirus in China | कोरोनानंतर आता चीनमध्ये हंता व्हायरस; एकाचा मृत्यू
‘हंता’ नावाचा जीवघेणा व्हायरसमुळे चीनमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर 32 लोकांची तपासणी करण्यात येत आहे.
बिजिंग : करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या या करोना व्हायरसने अत्तापर्यंत जगभरात हजारो बळी घेतले आहे. त्यातच आता चीनमध्ये आणखीन एका व्हायरसची भर पडली आहे. ‘हंता’ नावाचा जीवघेणा व्हायरस चीनमध्ये पसरम्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
‘हंता’ नावाचा जीवघेणा व्हायरसमुळे चीनमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर 32 लोकांची तपासणी करण्यात येत आहे. आधीच कोरोनावर औषध न सापडल्यामुळे जगभरात 16 हजार पेक्षा जास्त लोकाना प्राण गमवावे लागले आहे. त्यात आता हंताची भर पडली आहे.
युन्नान प्रांतामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार युन्नान प्रांतामध्ये एका व्यक्तीचा हंता या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती बसमधून प्रवास करत होता. या व्यक्तीला हंता व्हायरसची लागण झाली होती. यावेळी बसमध्ये 32 प्रवासी होते. आता त्यांची देखील तपासणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या या माहितीनुसार सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
हंता व्हायरस कशाने होते? लक्षणं काय?
हंता व्हायरस पसरण्याचं मुख्य कारण म्हणजे उंदीर आणि खार (Squirrel). हंता हा व्हायरस उंदीर आणि खार यांच्या संपर्कात आल्यास होतो. तसेच घरात येणाऱ्या उंदीरांमुळे देखीव हा व्हायरस पसरु शकतो. तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस करोना सारखा घातक नाही आहे.
हंता व्हायरसची लक्षणं काय?
थकवा, ताप आणि स्नायूंमध्ये दुखणे, चक्कर येणे, थंडी वाजणं आणि पोटाचे विकार ही प्राथमिक लक्षणं आहेत. तसेच सुखा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे हे देखील या व्हायरसचं लक्षण आहे.
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या घरात
भारतात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये आतापर्यंत 499 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहे. मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे. हा विषाणू पसरण्यापासून त्याच्या उपचारांपर्यंत अनेक अफवा पसरत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटना वेळोवेळ या अफवा फेटाळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement