एक्स्प्लोर
Advertisement
अदानींच्या 200 कोटींच्या दंडमाफीवर जावडेकर काय म्हणाले?
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी पोर्ट अँड सेज लिमिटेड कंपनीला कुठलाही कर माफ केला नाही. उलट पर्यावरण विभागानं त्यांच्यावर कडक कारवाई केली, असं स्पष्टीकरण प्रकाश जावडेकरांनी दिलं आहे. प्रकाश जावडेकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी याबाबत सांगितलं.
अदानींना 200 कोटींचा दंड माफ केल्यामुळे जावडेकरांना मनुष्यबळ विकास मंत्रालय मिळाल्याची चर्चा सुरु आहे. त्याबद्दल प्रकाश जावडेकरांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
अदानींना करमाफीचं बक्षीस मिळालयं का? या प्रश्नाला उत्तर दतेना प्रकाश जावडेकर म्हणाले, "आम्ही उलट 200 कोटींपेक्षा जास्त, त्यांना ते 200 कोटींचंच भार ते देत होते, पण आम्ही तर पर्यावरणाचं जेवढं नुकसान झालं, तो खर्चही त्यांना करावा लागेल आणि याचं मोजमाप करण्याचं काम दोन रिसर्च संस्थांना दिलं आहे. त्यामुळे आमचा निर्णय खूप पारदर्शी आहे. त्यामुळे काँग्रेसचा आरोप फार काही टिकला नाही."
गुजरातमधील मुंदडा बंदर निर्मितीवेळी अदानी कंपनीनं पर्यावरणाचं नुकसान केलं त्याबदल्यात कंपनीला दोनशे कोटींचा दंड ठोठाविण्यात आला आहे. मात्र, पर्यावरण मंत्रालयानं हा दंड माफ केल्याचा आरोप काँग्रेसनं केला. त्यावर जावडेकरांनी हे स्पष्टीकरण दिलं.
VIDEO : पाहा काय म्हणाले जावडेकर?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement