एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017
1. राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंतचं कर्ज माफ, फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय, 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, कर्जमाफीला 'छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना' असं नाव https://goo.gl/h6RPXB
2. कर्जमाफीला केवळ सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी पात्र, आजी-माजी मंत्री, टॅक्स भरणारे आणि व्यापाऱ्यांना वगळलं, मुख्यमंत्र्यांची माहिती https://goo.gl/h6RPXB
3. शेतकरी कर्जमाफीचा परिणाम सातव्या वेतन आयोगावर होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा https://goo.gl/h6RPXB
4. सलगच्या सुट्ट्यांमुळे आजपासून तीन दिवस बँका बंद, रोखीचे व्यवहार करणाऱ्यांना पैशांची चणचण भासण्याची शक्यता https://goo.gl/eovzbm
5. औरंगाबादचे वीरपुत्र संदीप जाधवांवर केळगावात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, तर कोल्हापूरच्या श्रावण मानेंनाही गोगवेमध्ये अखेरची मानवंदना https://goo.gl/9LUrWL
6. मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्याबाबत माहिती मागवणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला वाटाण्याच्या अक्षता, परदेश दौऱ्याचा तपशील देण्यास प्रशासनाची टाळाटाळ https://goo.gl/E4jv7Q
7. खासगी वाहनांनाही 'स्कूल बस' परमिट मिळणार, राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती https://goo.gl/wM7wDT
8. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना स्वाईन फ्ल्यूचा विळखा, गर्भवतीसह 10 जणांचा मृत्यू, 285 जणांना स्वाईन फ्लूची लागण https://goo.gl/Y9NV64
9. मुंबईतील भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा मृत्यू, अधिकाऱ्याच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप, संतप्त कैद्यांचं आंदोलन https://goo.gl/suUATa
10. मध्य रेल्वेवरील रविवारच्या विशेष ब्लॉकमुळे एक्स्प्रेसवर परिणाम, डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेस रद्द, 6 तासांसाठी लोकल सेवा बंद राहणार, डोंबिवली ते बदलापूरदरम्यान मेगाब्लॉक https://goo.gl/u9DjRr
11. मान्सूनच्या तोंडावर ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर सेलचा बंपर धमाका, अनेक ठिकाणी 80 टक्क्यांपर्यंत सूट https://goo.gl/ruH2D1
12. विठू माऊलीच्या जयघोषात पालख्या पंढरीच्या दिशेने, ज्ञानोबांच्या पालखीचं नीरास्नान, तर तुकोबांची पालखी बारामती मुक्कामी http://abpmajha.abplive.in/live-tv/
13. ‘आप’ला निवडणूक आयोगाचा झटका, 21 आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार, संसदीय सचिवपदी बेकायदीर नियुक्ती भोवण्याची शक्यता https://goo.gl/uk8H8B
14. पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना, पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होणार https://goo.gl/pXxKX2
15. बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट' पेटलीच नाही, सलमानच्या सिनेमाला पहिल्या दिवशी केवळ 21.15 कोटींची ओपनिंग, ईदच्या मुहूर्तावर सर्वात कमी कमाई करणारा सिनेमा https://goo.gl/s66UBM
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement