(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mamata Banerjee : पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय, पोलीस भरतीसाठीची वयोमर्यादा 27 वरुन 30 वर्षापर्यंत वाढवली
पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एक मोठा निर्णय घेतला. राज्यातील पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) लागणाऱ्या वयोमर्यादेत वाढ केली आहे.
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एक मोठा निर्णय घेतला. राज्यातील पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) लागणाऱ्या वयोमर्यादेत वाढ केली आहे. पोलीस भरतीसाठी 27 वर्षाची वयोमर्यादा होती, ती आता 30 वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारनं घेतला आहे. हा पश्चिम बंगालमधील तरुणांना दिलासा देणार निर्णय आहे. कारण वयोमर्यादेमुळं अनेक तरुणांना इच्छा असून देखील भरतीची तयारी करण्यात येत नव्हती. मात्र, आता 30 वर्षापर्यंत पोलीस भरती करता येणार आहे.
दरम्यान, अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करताना पोलिसांच्या नातेवाइकांना वय आणि शारीरिक निकषांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. पदोन्नतीसाठी देखील वयोमर्यादा 27 वर्षांवरून 35 वर्षे करण्यात आली आहे. पोलीस, नागरिक स्वयंसेवक, नागरिक पोलीस, सर्वजण या अंतर्गत अर्ज करु शकतात. पोलिस वाहन चालकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांच्या वाहन चालकांना 11 हजार 500 रुपये पगार मिळत होता. तर राज्यातील पोलीस वाहन चालकांना 13 हजार 500 रुपये मिळत होते. मात्र, त्यामध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोलकाता पोलिसांच्या वाहन चालकांना आता13 हजार 500 तर राज्यातील पोलीस वाहन चालकांना 15 हजार रुपयापर्यंत वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंत्राटदार असणाऱ्या चालकांना देखील कायमस्वरुपी नोकरीत प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली.
आता सर्व श्रेणीतील पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेश भत्ता दिला जाणार
पोलिसांचा मृत्यू झाला की त्याच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी दिली जाते. मात्र, त्यांच्या बाबतीत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना नोकरी मिळवण्यासाठी शाररिक निकष जास्त नसणार आहेत. त्यामध्ये शिथीलता देण्याचा निर्णय घेतल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. सहायक पोलिस आयुक्त (Assistant Commissioner of Police) आणि पोलिस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) यांच्या गणवेश भत्त्यात देखील वाढ करण्यात आली आहे. हा भत्ता आता 15,000 रुपये असणार आहे. आता सर्व श्रेणीतील पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेश भत्ता दिला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- मोठी बातमी! राज्यात लवकरच साडेसात हजार पोलिसांची भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा