एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 63 टक्के मतदान
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 73 जागांसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. 15 जिल्ह्यातील 73 जागांसाठी 63 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचंही निवडणूक आयोगाने सांगितलं.
2012 सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी 61 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे हे विक्रमी मतदान मानलं जात आहे. जवळपास 3 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे आता 839 उमेदावारांचं नशिब ईव्हीएम मशिनमध्ये बंद आहे.
पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात दारु आणि पैसे जप्त करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या काळात 19 कोटी 56 लाख रुपये, आणि 14 कोटी रुपये किंमतीची 4.4 लाख लीटर दारु जप्त करण्यात आली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसपा अध्यक्ष मायावती आणि भाजपची प्रतिष्ठा उत्तर प्रदेशमध्ये पणाला लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement