corona | कोरोनाकाळात भारतातील तब्बल 37.5 कोटी बाच्या आरोग्य आणि शिक्षणाचे नुकसान; सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेन्टचा अहवाल
जगातल्या 50 कोटी बालकांचे कोरोना (corona) काळात आरोग्य आणि शिक्षणाचे नुकसान झाले असून त्यापैकी अर्ध्याहून जास्त बालके ही भारतातील आहेत असं हा अहवाल सांगतोय.
नवी दिल्ली: कोरोना काळात सगळ्या जगालाच अडचणींचा सामना करावा लागला होता. या काळात गरीब लोक आणखी गरीब झाले तर अनेकांचे रोजगार गेले. कोरोना काळात भारतातील शून्य ते चार वयोगटातील तब्बल 37.5 कोटी बालकांच्या आरोग्याचे आणि शिक्षणाचे मोठं नुकसान झालं आहे असं सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेन्टचा अहवाल सांगतोय.
कोरोना काळात जगातील जवळपास 50 कोटी बालकांचे आरोग्य आणि शिक्षणाचे नुकसान झाले आहे आणि त्यातले अर्धेअधिक बालकं हे भारतातील आहेत असंही या अहवालात सांगितलं आहे. सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेन्टने हा अहवाल तयार केला असून तो 'डाऊन टू अर्थ' या मासिकात प्रकाशित करण्यात आला आहे.
कोरोना काळात जगातल्या गरीब लोकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे त्यांच्या जगण्यावर परिणाम झाला असून जवळपास 11.5 कोटी लोकं अत्यंत गरिबीत ढकलले गेले. त्यापैकी बहुतांश लोक हे दक्षिण आशियातील आहेत. सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेन्टच्या प्रमुख सुनिता नरेन यांनी सांगितलं आहे.
भारत सध्या शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून जगातल्या 192 देशांमध्ये 117 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान देशाचा अपवाद वगळता भारत दक्षिण आशियातील सर्वच देशांच्या पिछाडीवर आहे. भारताचा विचार करता केरळ, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगना या राज्यांचा नंबर वरचा आहे तर बिहार, झारखंड, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मेघालयाची कामगिरी अत्यंत नकारात्मक असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय.
2009 ते 2018 या दरम्यान भारतातील हवा आणि पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. जवळपास 6.9 लाख भारतीय लोकांचा हवा प्रदूषणामुळे मृत्यू झाला आहे. पैशाच्या हिशोबात सांगायचं तर यामुळे देशाच्या 1.36 टक्के जीडीपीचे नुकसान झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय.
दिल्ली, मुंबई, कोलकातासह भारतातील अनेक शहरांना प्रदूषित हवेचा सामना करावा लागताना दिसत आहे. गेल्या काही दशकांपासून देशामधील प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय.
प्लास्टिक कपला बिस्किट कपचा पर्याय देणारे कोल्हापूरचे 'थ्री इडियट्स'