एक्स्प्लोर
Advertisement
पाच वर्षात तब्बल 27 कर्ज बुडवे देश सोडून पळाले
गेल्या पाच वर्षात तब्बल 27 उद्योगपतींनी हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशातून पळ काढला आहे. या संदर्भातील माहिती शुक्रवारी संसदेत देण्यात आली.
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षात तब्बल 27 उद्योगपतींनी हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशातून पळ काढला आहे. या संदर्भातील माहिती शुक्रवारी संसदेत देण्यात आली.
अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. मागील पाच वर्षात देश सोडून पळालेल्या या 27 पैकी 8 जणांना 'रेड कॉर्नर नोटीस' बजावण्यात आली असून इतरांना नोटीस बजावण्यासाठी इंटरपोल सोबत बोलणी सुरु असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
आतापर्यंत यापैकी सहा आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी सरकारतर्फे अर्ज करण्यात आला आहे. तसेच 27 पैकी 7 जणांवर 'आर्थिक नियमन अधिनियम 2018' नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे देखील शुक्ला यांनी सांगितले.
भारतीय बँकाचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय माल्याला भारतात आणण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. याबाबत लंडनच्या कोर्टाने माल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिल्याचीही माहिती यावेळी संसदेत देण्यात आली.
भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी ५० कोटींहून अधिक कर्ज घेणाऱ्या कंपन्यांचे मालक/संचालक यांच्या पासपोर्टची प्रत घेण्याचे आदेश सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देण्यात आल्याचेही शुक्ला यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement