(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये बस दरीत कोसळून अपघात, 33 जणांचा मृत्यू
बसमध्ये सुमारे 60 ते 70 जण प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. कुल्लूमधील बंजार परिसरात हा भीषण अपघात झाला आहे.
शिमला : हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात एक बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 37 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. कुल्लूमधील बंजार परिसरात हा भीषण अपघात झाला आहे.
#UPDATE Banjar SDM MR Bhardwaj: 33 people dead, 37 injured after a private bus fell into a deep gorge near Banjar area of Kullu district, earlier today. Rescue operations underway. The bus was on its way from Banjar to Gadagushani area. #HimachalPradesh
— ANI (@ANI) June 20, 2019
कुल्लू पोलीस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बस बंजर तहसीलमध्ये धोथ येथील वळणावर 500 फूट खोल ओढ्यात कोसळली. बसमध्ये सुमारे 60 ते 70 जण प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. बस गुशानी येथे जात होती. घटनेची माहिती मिळतात पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही बस अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथील बस दुर्घटना दु:खद आहे. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे.
#UPDATE Himachal Pradesh: 20 dead after a private bus fell into a deep gorge near Banjar area of Kullu district, earlier today. Rescue operations underway. The bus carrying around 50 passengers was on its way from Banjar to Gadagushani area. https://t.co/5NnYHs6tF5
— ANI (@ANI) June 20, 2019