एक्स्प्लोर

23 January In History : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, इतिहासात आज

On This Day In History : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांची आज जयंती आहे.

On This Day In History : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांची आज जयंती आहे. नेताजींनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा निभावला. त्याच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा, बंगाल विभागात झाला. बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. सुभाषचंद्र बोस यांचे वडील जानकीनाथ बोस हे व्यवसायाने वकील होते आणि त्यांची आई गृहिणी होत्या. नेताजी यांचे प्राथमिक शिक्षण कटक येथील रेवेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांचे पुढील शिक्षण कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले. यानंतर त्यांच्या पालकांनी बोस यांना भारतीय नागरी सेवेची तयारी करण्यासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात पाठवले. नेताजींनी 1920 मध्ये इंग्लंडमध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित चळवळींमध्ये सहभागी होते. सुभाषचंद्र बोस यांच्यावर लहानपणापासूनच स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण यांच्या शिकवणुकीचा प्रभाव होता. 1942 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरची भेट घेतली आणि त्यांनी भारताला स्वतंत्र करण्याचा प्रस्ताव ठेवला. पण हिटलरने भारताच्या स्वातंत्र्यात रस दाखवला नाही आणि सुभाषचंद्र बोस यांना कोणतेही स्पष्ट वचनही दिले नाही. 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिनमध्ये आझाद हिंद रेडिओ आणि फ्री इंडिया सेंट्रलची स्थापना केली. 1943 मध्येच आझाद हिंद बँकेने 10 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंतची नाणी जारी केली. एक लाख रुपयांच्या नोटेत नेताजी सुभाषचंद्रांचे चित्र छापण्यात आले होते. महात्मा गांधींना सुभाषचंद्र बोस यांनी 'राष्ट्रपिता' असे संबोधले होते. सुभाषचंद्र बोस यांना 1921 ते 1941 या काळात देशातील वेगवेगळ्या तुरुंगात 11 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस दोनदा निवडून आले. सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दल बोलायचे झाले तर ते आजपर्यंत गूढच राहिले आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती (Balasaheb Thackeray)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली. बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे या वादळाचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1955 साली बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात एक व्यंगचित्रकार म्हणून केली. इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे. शिवसेनेने 1984 साली भाजपसोबत युती केली. त्याच्या पुढच्याच वर्षी शिवसेनेने भाजपच्या मदतीने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली. 1989 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाच्या हिताच्या आणि अधिकाराच्या गोष्टी मांडल्या. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघी मुंबई स्तब्ध झाली.

1977 : इंदिरा गांधींच्या विरोधात जनता पक्षाची स्थापना (Janata Party)

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीनंतर (1975-1976) जनसंघासह भारतातील प्रमुख राजकीय पक्षांचे विलीनीकरण करून 'जनता पक्ष' हा नवा पक्ष स्थापन करण्यात आला. जनता पक्ष 1977 ते 1980 पर्यंत केंद्रात सत्तेत होती. 1980 मध्ये अंतर्गत मतभेदांमुळे जनता पक्ष फुटला.

इतर महत्वाच्या घटना आणि घडामोडी

1915: उद्योगपती कमलनयन बजाज यांचा जन्मदिन 

1919 :  नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांची पुण्यतिथी  

1920: हवाई वाहतूक आणि हवाई टपाल सेवेची सुरुवात.

1930: साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते असलेले डेरेक वॉलकोट यांचा जन्म.

1973: अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम शांतता कराराची घोषणा केली आणि यासह अमेरिकेने लढलेले सर्वात प्रदीर्घ युद्ध संपले. 27 जानेवारीपासून युद्धविराम लागू झाला.

2002: अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांचे पाकिस्तानमधील कराची येथून अपहरण करण्यात आले. नंतर त्यांची हत्या करण्यात आली.

2010: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांची जयंती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Sangram Morcha : सोलापुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांचा मोर्चाYugendra Pawar on Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होईलLaxman Hake - Manoj Jarange : मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं - मनोज जरांगेManoj Jarange Sambhajinagar PC : काही जणांना थुंका चाटायची सवय असते,  लक्ष्मण हाकेंना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Embed widget