एक्स्प्लोर

जीएसटीमध्ये शेतकरी आणि लघु उद्योजकांना सूट मिळणार

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्यांनी शेतकऱ्यांना वस्तू आणि सेवाकर (GST)साठी नोंदणीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 20 लाखापर्यंतची वार्षिक उलाढाल असलेल्या लघु उद्योजकांनाही जीएसटीसाठी नोंदणीमध्ये सूट दिली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाला. विशेष म्हणजे, जीएसटी परिषदेने करदात्यांकडून कराचे हप्ते जमा करताना त्यामध्ये सूट देण्याचा अधिकार आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांना दिला आहे. यातून करदात्यांना आर्थिक टंचाईच्या काळात अडचणींवर मात करण्यास मदत मिळणार आहे. या बैठकीत केंद्रीय जीएसटी (C-GST) आणि संयुक्त जीएसटी (I-GST) अशा दोन विधेयकांच्या मसुद्याला अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात, हे विधेयक सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या परिषदेत सर्व राज्यांचे प्रतिनिधी असून, परिषदेने ईशान्येकडील राज्यांना वगळून इतर सर्व राज्यातील लघु उद्योजकांसाठी 20 लाखांचे वार्षिक उत्पन्न निश्चित केलंय. तर ईशान्येकडील राज्यांसाठी ही मर्यादा 10 लाख रुपये असणार आहे. अर्थमंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्या उद्योजकाची वार्षिक उलाढाल 20 लाखापर्यंत आहे, त्यांना जीएसटीसाठी नोंदणी करण्याची गरज नाही. शिवाय शेतकऱ्यांनाही जीएसटी व्यवस्थेअंतर्गत नोंदणी करण्याची गरज नसेल. दुसरीकडे परिषदेने निर्यातदारांनाही दिलासा दिला आहे. कारण जे निर्यातदार 90 टक्के रिफंडचा दावा करतील, त्यांना सात दिवसांच्या आत त्याचा परतावा मिळण्याची तरतूद केली आहे. याशिवाय करदात्यांना त्यांचे रिटर्न्स भरणे, कराचे पेमेंट आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी राज्यानिहाय संयुक्त नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget