एक्स्प्लोर
नोटाबंदी : 15 दिवसात काय झालं, 24 नोव्हेंबरनंतर काय होणार?

मुंबई : नोटबंदीच्या निर्णयाला 15 दिवस उलटल्यानंतरही देशातील चित्र अद्यापही तसंच आहे. लोक अजूनही बँका-एटीएमच्या रांगेत उभेत आहेत. मात्र आधीच्या तुलनेत आता बँकेबाहेरील गर्दी रोडावली आहे. पण लोकांच्या अडचणी कायम आहेत. काही ठिकाणचे एटीएम बंद आहेत, तर काही एटीएममध्ये पैसेच नाहीत. दुसरीकडे पेट्रोलपंप, रुग्णालयं, सरकारी कार्यालयं, एसटी अशा कोणत्याही ठिकाणी आज मध्यरात्रीपासून जुन्या नोटा चालणार नाहीत. याशिवाय टोल नाक्यांवर दिलेली सूटही आज मध्यरात्रीपासून संपुष्टात येणार आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर केंद्र तसंच राज्य सरकारनं सरकारी विभागांमध्ये 24 नोव्हेंबरपर्यंत जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा घेण्यास परवानगी दिली होती. तसेच चलन तुटवड्यामुळे सुट्ट्या पैशांवरुन होणाऱ्या वादांमुळे 24 नोव्हेंबरपर्यंत टोलबंदीची घोषणा केली होती. ही मुदत आज मध्यरात्रीनंतर संपणार आहे. मात्र 30 डिसेंबरपर्यंत जवळच्या बँकेतून नागरिकांना या नोटा बदलून घेता येणार आहेत. पण या 15 दिवसांत काय झालं, 24 नोव्हेंबरनंतर काय होणार तसंच 30 डिसेंबरनंतर काय करायचं? 15 दिवसात काय झालं? - 1 लाख 10 हजार एटीएमचं रि-कॅलिब्रेशन पूरण - एटीएममधून 500, 2000 च्या नोटा मिळण्यास सुरुवात - बँकांत ठेवीदारांचे 6 लाख कोटी जमा झाले - बँकांमधून ठेवीदारांनी दीड लाख कोटी काढले - 21 हजार कोटी रुपये जनधन खात्यावर जमा - टोलमुक्तीमुळे वाहनधारकांचे 700 कोटी वाचले उद्यापासून काय होणार? - पेट्रोल पंप, रुग्णालयात जुन्या नोटा स्वीकारणं बंद - रेल्वे सेवा, विमानतळांवरही जुन्हा नोटांना बंदी - मेट्रो, दूध केंद्र, वीज, पाणी बिलातही जुनं चलन नाही - टोल नाके, स्मशानभूमीवरही जुन्या नोटा हद्दपार - मेडिकल दुकानं, गॅस एजन्सीतही जुनं चलन चालणार नाही जुन्या नोटांचं काय होणार? - कोणत्याही बँकेत नोटा बदलण्याची सोय - पण दररोज फक्ट 2 हजारांचीच मर्यादा - शिवाय मुदत फक्त 30 डिसेंबरपर्यंत 30 डिसेंबरनंतर काय करायचं? - 31 मार्चपर्यंतही नोटा बदलता येतील - पण त्या का बदलल्या नाहीत हे सांगावं लागेल - त्या नोटा कुठून आल्या हे सांगणं बंधनकारक - शिवाय एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल आता सुट्टी पैसे कुठून मिळतील? - बँकांमधून सुट्टी पैसे मिळत राहणार - पेट्रोल पंपावर कार्ड स्वाईप करुन मिळणार - बिग बाझारमध्येही कार्डद्वारे पैसे मिळण्याची सोय - शेतकऱ्यांच्या जुन्या 500 च्या नोटा बियाणे दुकानात स्वीकारतील इतर सुविधांचे काय होणार? - राज्यभरातील टोल वसुली पुन्हा सुरु होईल - एअरपोर्टवरच्या पार्किंगची सूट तारखेपर्यंतच - लग्नासाठी अडीच लाखांची मुभा कायम राहिल
आणखी वाचा























