एक्स्प्लोर
बारावीत 99.99 टक्के गुण, तरीही शिक्षणाला रामराम
![बारावीत 99.99 टक्के गुण, तरीही शिक्षणाला रामराम 12th Standerd A Student Who Secure 99 9 Percent Marks In Board Exam Choose Initiation In Place Of Career बारावीत 99.99 टक्के गुण, तरीही शिक्षणाला रामराम](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/07174221/varshil-shah.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदाबाद : बारावी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश संपादन करणारे विद्यार्थी जीवनात काहीतरी करुन दाखवण्याच्या इराद्याने करीअरच्या नव्या संधीच्या शोधात असतात. पण दुसरीकडे गुजरात बोर्ड परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवलेला विद्यार्थ्यांने संन्यास घेण्याचा निर्णय घातला आहे. वार्शिल शहा असं या विद्यार्थ्याचं नाव असून, 8 जून रोजी तो जैन मुनीची दीक्षा घेणार आहे.
वार्शिल शाह अहमदाबादचा मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी आहे. त्याने 12 वीच्या बोर्ड परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवले. त्याच्या या यशाबद्दल सध्या त्याचं संपूर्ण गुजरातमध्ये कौतुक होत आहे. पण त्याने सीए, सीएसचं स्वप्न पाहण्याऐवजी जैन मुनीची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
वार्शिलचे वडील जिगरभाई शाह आयकर विभागात इंस्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. वार्शिच्या निर्णयावर त्यांना आनंद होत असल्याचं सांगून ते म्हणाले की, ''त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा कल अध्यात्माकडे जास्त राहिला आहे. त्याची आई अमी ही देखील अध्यात्मिक आहे. वार्शिल आपल्या सुट्टीत फिरायला जाण्याऐवजी सत्संगाला जात असे.
जैन धर्माचं अनुकरण करणारे वार्शिलचे कुटुंबिय अतिशय साधेपणानं राहतात. त्यांच्या घरात विजेचा अतिरिक्त वापर कटाक्षानं टाळला जातो. विशेष म्हणजे, विजेचा वापर केवळ रात्री मुलांना अभ्यासासाठीच होत, असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं
वार्शिलच्या संन्या घेण्याच्या निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलं की, ''वार्शिल तीन वर्षापूर्वी जैन मुनी श्री कल्याण रत्न विजय यांच्या संपर्कात आला, आणि त्यांच्या प्रवचनानं त्याचा अध्यात्माककडे कल वाढला. जैन भिक्षुची दीक्षा घेण्यासाठी तो आपलं शिक्षण पूर्ण होण्याची वाट पाहात होता.''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)