एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'या' 12 जागांमुळे काँग्रेस सत्तेपासून दूर

गुजरातमध्ये 12 जागांवर 3 हजारहून कमी मतांनी भाजपने विजय मिळवला. या जागांवर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे इथे काँग्रेसने आणखी थोडी मेहनत घेतली असती, तर त्या जागा पदरात पाडून घेता आल्या असत्या आणि सत्तेच्या जवळ जाता आलं असतं.

गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपच्या 22 वर्षांच्या सत्तेला काँग्रेसने तोडीस तोड आव्हान दिलं. 115 जागांवरुन भाजपला दोन आकडी जागांवर म्हणजे 99 जागांवर खेचण्यात काँग्रेसला यश आलं. मात्र सत्तेची चावी काही हातात घेता आली नाही. काँग्रेसच्या जागांची गाडी 80 वरच थांबली. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 12 जागा कमी पडल्या. मात्र, गुजरातमध्ये 12 जागांवर 3 हजारहून कमी मतांनी भाजपने विजय मिळवला. या जागांवर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे इथे काँग्रेसने आणखी थोडी मेहनत घेतली असती, तर त्या जागा पदरात पाडून घेता आल्या असत्या आणि सत्ता काबीज करता आली असती. कोणत्या 12 जागांवर काँग्रेसचा निसटता पराभव झाला? 1. गोध्रा -  गोध्रा हत्याकांडानंतर प्रकाशझोतात आलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचा अगदी निसटता पराभव झाला आहे. केवळ 258 मतांनी या जागेवर भाजपच्या सी. के. राऊलजी यांचा काँग्रेसच्या राजेंद्रसिंह परमार यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, सी. के. राऊलजी हे आधी काँग्रेसमध्येच होते. मात्र, या विधानसभेआधी ते भाजपच्या गोटात सामिल झाले. राऊलजी यांना रोखण्यात काँग्रेसला यश आले असते, तर गोध्राची जागा काँग्रेसच्या खात्यात असती. 2. धोलका - या जागेवर भाजपच्या भूपेंद्रसिंह मनुभा चुडासमा यांनी काँग्रेसच्या अश्विनभाई राठोड यांचा पराभव केला. मात्र भाजपच्या विजयी उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा केवळ 327 जास्त मतं जास्त मिळवली आहेत. 3. बोटाद - भाजपचे सौरभ पटेल यांनी या जागेवर बाजी मारली. काँग्रेसच्या धीरजलाल कठथीया यांचा पराभव केला आहे. दोघांच्या मतांमधील फरक केवळ 906 एवढा आहे. या मतदारसंघातून एकूण 17 अपक्ष उमेदवार उभे राहिले होते. त्यांचा फटका काँग्रेसला बसला. 4. विजापूर - पाटीदार समाजाचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. विजापुरात भाजपचे रमणभाई पटेल यांनी काँग्रेसच्या नाथाभाई पटेल यांचा 1164 मतांनी पराभव केला. 5. हिमतनगर - भाजपच्या राजेंद्रसिंह चावडा यांनी काँग्रेसच्या कमलेशभाई पटेल यांचा 1712 मतांनी पराभव केला. इथे काँग्रेसने मेहनत घेतली असता, विजय मिळवता आला असता. 6. गारियाधार - केशुभाई नाकराणी या भाजप उमेदवाराने काँग्रेसच्या परेशभाई खेनी यांचा केवळ 1876 मतांनी पराभव केला. 7. उमरेठ - भाजपच्या गोविंदभाई परमार यांनी काँग्रेसच्या कपीलाबेन चावडा यांचा 1883 मतांनी पराभव केला. इथेही काँग्रेसने फार लक्ष न दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे जागा हातून निसटली. 8. राजकोट ग्रामीण - या जागेवर केवळ 2179 मतांनी भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. भाजपच्या लाखाभाई सागठीयांना 92 हजार 114, तर काँग्रेसच्या वश्रामभाई सागठीयांना 89 हजार 935 मतं मिळाली. 9. खंभात - भाजपच्या महेशकुमार रावल यांनी काँग्रेसच्या खुशमनभाई पटेल यांना 2 हजार 318 मतांनी पराभूत केले. 10. वागरा - 2 हजार 628 मतांनी भाजपच्या अरुणसिंह रणा यांनी काँग्रेसच्या सुलेमानभाई पटेल यांचा पराभव केला. 11. फतेहपुरा - भाजपच्या रमेशभाई कटारा यांनी काँग्रेसच्या रघूभाई मच्छर यांचा 2 हजार 711 मतांनी पराभव केला. 12. विसनगर - ऋषिकेश पटेल हे भाजपचे उमेदवार 2 हजार 869 मतांनी विजयी झाले. इथे काँग्रेसच्या महेंद्रकुमार पटेल पराभूत झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 25 Nov 2024 : 12 NoonNana Patole Delhi : विधानसभेच्या निकालाबाबत नाना पटोले राहुल गांधींसोबत चर्चा करणार  @abpmajhatvABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 26 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सEknath Shinde Resigns, To Serve As Caretaker Maharashtra Chief Minister : एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नियुक्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून पुरलं; 10 महिन्यांनी थेट जंगलात सांगाडाच सापडला
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून पुरलं; 10 महिन्यांनी थेट जंगलात सांगाडाच सापडला
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Embed widget