एक्स्प्लोर

Rajya Sabha Seat : लोकसभा निवडणुकीने राज्यसभेच्या 10 जागा रिक्त; राज्यातील 2 जागांचा समावेश, कोणाला मिळणार संधी?

Rajya Sabha Seat : यावेळी अनेक राज्यसभा सदस्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक जिंकून ते लोकसभेत पोहोचले आहेत. या स्थितीत राज्यसभेच्या 10 जागा रिक्त झाल्या आहेत.

Rajya Sabha Seat : देशात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पीएम मोदींशिवाय आणखी 71 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिपदेही विभागली गेली आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेच्या 10 जागा रिक्त झाल्या आहेत.

राज्यातून कोणाला संधी मिळणार? 

यावेळी अनेक राज्यसभा सदस्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक जिंकून ते लोकसभेत पोहोचले आहेत. या स्थितीत राज्यसभेच्या 10 जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये राज्यातील दोन जागांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवताना उत्तर मुंबईतून विजय मिळवला. सातारमधून उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला. रिक्त झालेल्या दोन्ही जागा भाजपच्या कोट्यातील आहेत. त्यामुळे या जागांवर कोणाला संधी दिली जाणार? याची उत्सुकता आहे.

पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेला अटीतटीच्या लढतीत पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे त्यांना संधी दिली जाणार का? याचीही उत्सुकता आहे. केंद्रीय मंत्रीमंडळात कोकण आणि मराठवाडाला संधी मिळालेली नाही. त्यामुळे प्रादेशिक समतोल साधण्यासाठी या दोन विभागातून भाजपकडून कोणाला संधी दिली जाईल याची उत्सुकता असेल.

राज्यसभेच्या कोणत्या जागा रिक्त झाल्या? 

  • कामाख्या प्रसाद तास (आसाम)
  • सर्बानंद सोनोवाल (आसाम)
  • मीसा भारती (बिहार)
  • विवेक ठाकूर (बिहार)
  • दीपेंद्रसिंग हुड्डा (हरियाणा)
  • ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया (मध्य प्रदेश)
  • छत्रपती उदयनराजे भोसले (महाराष्ट्र)
  • पियुष गोयल (महाराष्ट्र)
  • के. सी. वेणुगोपाल (राजस्थान)
  • बिप्लब कुमार देब (त्रिपुरा)

पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईचा गड राखला

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरलेल्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) विजयी झाले होते. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा 3 लाख 57 हजार मतांनी पराभव केला. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ (Mumbai North Lok Sabha Election) हा भाजपच्या उमेदवारासाठी सर्वात सुरक्षित लोकसभा मतदारसंघापैकी समजला जाणारा हा मतदारसंघ आहे. 

सातारा लोकसभेला उदयनराजे भोसलेंचा विजय 

सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना पराभूत केले होते. त्यामुळे भाजपला दुसऱ्या प्रयत्नात सातारा मतदारसंघात कमळ फुलवता आले. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच सातारा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. महायुतीत मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच झाली होती.

महाविकास आघाडीमध्येही विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याने लढणार कोण हा प्रश्न होता. शेवटी आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात होते. पण, खरी लढत भाजपचे उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. चिन्हाचा फटकाही शशिकांत शिंदे यांना बसला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं

व्हिडीओ

Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report
Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget