Ladakh MP Mohmad Haneefa : लडाखच्या अपक्ष खासदाराचा काँग्रेसला पाठिंबा; इंडिया आघाडीचे लोकसभेतील संख्याबळ 237 च्या घरात
मोहम्मद हनीफा यांनी लडाख लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी त्यांचे जवळचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी त्सेरिंग नामग्याल यांचा 27 हजार 906 मतांच्या फरकाने पराभव केला.
Ladakh MP Mohmad Haneefa : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रात सरकार स्थापन केले आहे. मात्र, दरम्यानच्या काळात विरोधी पक्ष इंडिया अलायन्सची ताकदही दुसऱ्या बाजूने वाढत आहे. दोन अपक्ष खासदारांनी इंडिया आघाडीला बळ दिल्यानंतर लडाखचे खासदार मोहम्मद हनीफाही इंडिया आघाडीत सामील झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या हनीफा यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि इंडिया आघाडीत सामील झाले.
Ladakh Independent MP Mohammad Hanifa Jan ji along with local leaders met Shri @RahulGandhi in New Delhi. pic.twitter.com/7fTVqufiOH
— Congress (@INCIndia) June 11, 2024
2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर दोन दिवसांनी महाराष्ट्रातील सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेल्या विशाल पाटील यांनीही इंडिया अलायन्सला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी इंडिया अलायन्सला पाठिंबा जाहीर केला.
मोहम्मद हनीफा लडाखमधून खासदार
मोहम्मद हनीफा यांनी लडाख लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी त्यांचे जवळचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी त्सेरिंग नामग्याल यांचा 27 हजार 906 मतांच्या फरकाने पराभव केला. 2014 आणि 2019 मध्ये ही जागा भाजपने जिंकली होती. मात्र, यावेळी मोहम्मद हनीफा अपक्ष उमेदवार म्हणून येथून विजयी झाले.
या नेत्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील, बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले पप्पू यादव आणि आता मोहम्मद हनीफा यांनी इंडिया अलायन्सला पाठिंबा जाहीर केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया अलायन्सने 234 जागा जिंकल्या होत्या, तर एनडीए आघाडीने 293 जागा जिंकल्या होत्या. आता तीन अपक्ष खासदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर इंडिया आघाडीच्या जागांची संख्या 237 झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या