India vs Pakistan War : भारताने पाकिस्तानची पुन्हा जिरवली; पाकड्यांना रात्रभर भाजून काढलं, भारतीय लष्कराने दिली मोठी माहिती
भारताने पाकिस्तानला एका पाठोपाठ एक जबर दणका देत पाकड्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. अशातच आता पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्याबाबत भारतीय लष्कराने एक निवेदन जारी करता अधिकृत माहिती दिली आहे.

India vs Pakistan War: निव्वळ वल्गना करत छाती बडवणाऱ्या पाकिस्तानला भारताशी वाकड्यात जाणं चांगलेच माहागात पडले आहे. किंबहुना पाकिस्तानने (Pakistan) पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. कारण काल (8 मे 2025) संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर भारताने योग्य प्रत्युत्तर देत पाकड्यांचे मानसुभे हवेतच नेस्तनाबूत केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानला एका पाठोपाठ जबर दणका देत पुन्हा डिवचू पाहणाऱ्या पाकड्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. अशातच आता पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्याबाबत भारतीय लष्कराने एक निवेदन जारी करता अधिकृत माहिती दिली आहे.
देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध - भारतीय लष्कर
लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी 8 आणि 9 मे 2025च्या मध्यरात्री पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर दारूगोळ्यांचा वापर करून अनेक हल्ले केले." जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LOC) पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र नेहमी प्रमाणे ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आणि युद्धबंदी उल्लंघनाच्या प्रत्युत्तरात योग्य ती कारवाई करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. भारतीय लष्कर देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व दुर्दैवी घटनांना ताकदीने तोंड दिले जाईल. अशी प्रतिक्रियाही भारतीय लष्कराने एक निवेदनातून दिली आहे.
पाकिस्तानला भारतानं चोहीकडून घेरलं, देशात विशेष खबरदारी
दरम्यान, राजस्थानातील जैसलमेरमधील रामगड येथील बीएसएफ कॅम्पवर पहाटे 4.30 ते 5.30 वाजेपर्यंत ड्रोननं हल्ला करण्याचा आणखी एक प्रयत्न झाला. मात्र हा प्रयत्न हवाई संरक्षण यंत्रणेनं हाणून पाडला. तर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशातील उना इथे आज शाळा बंद राहतील. अशी माहिती समोर आली आहे. किंबहुना देशातील इतर जिल्ह्यांमध्येही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इकडे मुंबईतील मच्छिमारांना भारतीय नौदलाकडून अतिशय महत्वपूर्ण सूचना देत खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास 'शूट टू किल'च्या देखील सूचना देण्यात आल्या आहे. लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेतल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिणामी, 26/11 प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.























