India Pak War: पाकिस्तानची आता खैर नाही! पाकड्यांना जल, थल, आकाश सगळीकडे No Entry! सरकारचा महत्त्वाचा आदेश
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान स्वतःच्याच जाळ्यात अडकत चालला आहे असे दिसते. आता भारत त्यासाठी जल, थल, आकाश सगळीकडे No Entry करण्याच्या तयारीत आहे.

Pahalgam Terror Attack: भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानची डोकेदुखी वाढवण्याची तयारी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. भारत याला योग्य उत्तर देण्याची तयारी करत आहे. भारत आता पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वच स्थरातून कोंडी केल्या नंतर भारतात आता पाकिस्तानसाठी जल, थल, आकाश सगळीकडे No Entry! असणार असल्याचे चित्र आहे.
भारत आता पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची तयारी करत आहे. जर असे झाले तर पाकिस्तानचे मोठे नुकसान होईल. पाकिस्तान एअरलाइन्सचा पुढचा मार्ग आणखी लांब होईल. हवाई क्षेत्र बंद होण्यापूर्वीच पाकिस्तानी विमाने चीनच्या हवाई क्षेत्रावरून आग्नेय आशियाई देशांमध्ये जात होती.
पाकड्यांना जल, थल, आकाश सगळीकडे No Entry!
भारत पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र तसेच जलमार्गांवर निर्बंध लादू शकतो. भारत आपल्या बंदराबाबतही कारवाई करू शकतो. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अडचणी आणखीन वाढतील. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार पुढे ढकलला होता. यासोबतच आणखी काही निर्णय घेण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलंय. त्यामुळे भरात आता पाकिस्तान बाबत कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
पाकिस्तानच्या उचापत्या सुरूच!
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढला आहे, परंतु तरीही पाकिस्तान आपल्या कृतींपासून थांबत नाही. त्याने सलग पाचव्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन (Ceasefire) केले आहे. पाकिस्तानने बारामुल्लासह अनेक ठिकाणी गोळीबार केला. त्यांनी तुतमारी आणि रामपूर सेक्टरमधील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
भारतीय लष्कर कोणतीही कारवाई करण्यासाठी सज्ज: राजनाथ सिंह
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली. सुमारे 40 मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. कोणतीही कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्याचे समजते.
हे ही वाचा























