Pahalgam Zipline Video: पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडीओ, पर्यटक झिपलाईनिंग करत असताना खाली गोळीबार, हल्ल्यात वाचलेल्या ऋषी भट यांनी सांगितला थरार
Pahalgam Zipline Video: झिपलाईमध्येच गोळीबार सुरु झाला होता. खाली 4-5 जणांनी गोळ्या लागल्या होत्या. 'तो' माणूस अल्लाहू अकबर म्हणाला... पहलगाम हल्ल्यात वाचलेल्या ऋषी भट यांनी सांगितला थरार

Pahalgam Zipline Video: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला . या हल्ल्यात एकूण 28 पर्यटकांचा जीव गेला .भारतातील 26 जणांचा यात समावेश होता .या घटनेनंतर संपूर्ण जग हादरले . या हल्ल्यानंतर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड झाला . ज्यात अहमदाबादचे ऋषी भट जे पहलगामचा हल्ला होत असताना झिपलाईन करत होते . झिपलाइन करत असताना खाली गोळीबार सुरू झाला होता. झिपलाईनच्या मध्ये असतानाच खाली चार-पाच पर्यटकांना गोळ्या लागल्या होत्या . अवघ्या 7 मिनिटांच्या अंतराने ते वाचले . पहलगामच्या हल्ल्यानंतर 'ABP शी बोलताना त्यांनी हल्ल्याचा थरार सांगितला . (Pahalgam terror attack)
झिपलाईनमध्ये असतानाच गोळीबार सुरु..
पहलगाममध्ये कुटुंबीयांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ऋषी भट पोहोचले होते . काश्मीरच्या निसर्ग सौंदर्यात पोहोचल्यावर आपल्या कुटुंबीयांचे फोटो व्हिडिओ काढण्यात ते व्यस्त झाले .हल्ला झाला त्या ठिकाणी अनेक साहसी खेळ उपलब्ध होते . ऋषी भट सांगतात , " आम्ही सगळ्यांनी झिपलाईन करण्याचे ठरवले .आम्ही तिथे गेलो तेव्हा फार मोठी रांग होती .आमच्या पुढे तीन कुटुंब होती .आधी पहिलं कुटुंब नवरा-बायको आणि त्यांचा मुलगा झिपलाइनसाठी गेले . मग दुसरं कुटुंब गेलं .त्यानंतर आमची पाळी आली .आधी माझा मुलगा झिपलाईनसाठी गेला .मग पत्नी गेली नंतर माझी पाळी आली . मी झिपलाइनिंगसाठी गेलो त्यावेळी गोळीबार सुरू झाला होता . झिप लाईनच्या मध्ये असताना मी खाली पाहिलं त्यावेळी चार-पाच लोकांना गोळ्याही लागल्या होत्या . झिपलाईन करून खाली उतरल्या क्षणी झिपलाईनसाठी लावलेल्या दोऱ्या काढून बायको मुलांना घेऊन मी तिथून पळालो .मोठ्या मैदानापासून मेनगेटपर्यंत पोहोचलो, तोपर्यंत आम्हाला कोणतेही नेटवर्क नव्हतं .ज्या क्षणी नेटवर्क आल्याचं कळलं त्यावेळी अहमदाबादच्या माझ्या भावाला फोन करून इथे दहशतवादी हल्ला झाल्याचं सांगितलं .आम्ही इथे फसल्याच सांगितलं .साधारण 18 ते 22 मिनिटांमध्ये तिथे आर्मी दाखल झाली .कारण दुसऱ्या वेळी माझ्या भावाला मी कॉल करून इथे लष्कर आलं आहे आणि आम्हाला सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असल्याचं मी सांगितलं होतं .असं ऋषी भट म्हणाले .
तो अल्लाहू अकबर म्हणाला अन्...
हल्ला होण्यापूर्वी झिपलाईनसाठी जात असताना आमच्या समोर असलेली कुटुंब झिप लाईनसाठी जात होती . एक माणूस आम्हाला झिपलाइनसाठी सोडत होता.त्याच्या मागे बसलेला एक व्यक्ती जो सगळ्यांना बेल्ट लावत होता तो उर्दूमधील काहीतरी पुस्तकातून वाचत होता .आमच्या आधी गेलेल्या कुटुंब झिप लाईन साठी जात असताना तो काहीही बोलत नव्हता मात्र आमची वेळ आली तेव्हा 1 .28 वाजता तो माणूस अल्लाहू अकबर असे तीन वेळा म्हणाला .त्याचवेळी गोळीबार सुरू झाला . तो माणूस कदाचित या सगळ्यात कुठेतरी सामील होता .कारण फायरिंग सुरू होण्यावेळीच तो अल्लाहू अकबर म्हणाला असे ऋषी भट यांनी सांगितलं . भगवान शंकरासह माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आमच्या मागे होते, त्यामुळे आम्ही वाचू शकलो असे ऋषी भट यांनी सांगितले .
हेही वाचा:























